कार्यकर्ते हीच पक्षाची खरी ताकद- आ. आशुतोष काळे 

कार्यकर्ते हीच पक्षाची खरी ताकद- आ. आशुतोष काळे 

Workers are the real strength of the party- MLA Ashutosh Kale

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी  महाअभियान

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Tue 4 Feb 25  19.10 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पदाधिकार्‍याने व कार्यकर्त्याने झटून मेहनतीने शिस्तबद्ध काम केल्यानेच मला ऐतिहासिक मताधिक्य मिळाले. कार्यकर्ते हीच पक्षाची खरी ताकद  असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सदस्य नोंदणी महाअभियानाचा शुभारंभ केले.

आ. काळे पुढे म्हणाले नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच पुढे असतात. पुढे राहण्याची हि परंपरा सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी प्राधान्याने राबवून पक्षाची ताकद वाढवावी. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य हीच पक्षाची खरी सशक्तता आहे.

ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा,  यशवंतराव चव्हाणांचा आदर्श  जनतेचा विश्वास व  ना.अजित पवारांचे नेतृत्वामुळेच विधानसभेत  पक्षाला मोठे यश मिळाले  सामान्य जनतेचा पक्ष ही ओळख व विचारधार  घराघरात पोचवून  कार्यकर्त्यांनी. अजित पवार यांचे हात बळकट करावे असे आवाहन आ काळेंनी  केले.                 

याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,  माजी जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन,  व्हा.चेअरमन,  संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट :-    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी  कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सदस्य नोंदणी महाअभियानात स्वत:ला झोकून द्या,   -आ. आशुतोष काळे.

Leave a Reply

You cannot copy content of this page