आमदारांचा जनता दरबार,  शेती , महसुल, वन, व भूमी अभिलेख संबंधित  समस्या घेऊन लोक आले

आमदारांचा जनता दरबार,  शेती , महसुल, वन, व भूमी अभिलेख संबंधित  समस्या घेऊन लोक आले

People came to the Janata Darbar of MLAs with issues related to agriculture, revenue, forest and land records.

अधिवेशन वगळता आता दर सोमवारी जनता दरबार

 Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!  , Mon10 Feb  17.00 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :  मतदार संघाचे आ. आशुतोष  काळे म्हणाले की,आज जनता दरबारात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी शेती महामंडळ महसुल विभाग,वन विभाग, व भूमी अभिलेख या विभागासंबंधीत   लोकांच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जात आहेत.  

आ. आशुतोष काळे यांनी सोमवारी (१०) रोजी ११ वाजता  कोपरगाव तहसील  कार्यालयात आयोजित जनसुनावणी दरम्यान ते बोलत होते. 
यावेळी  त्यांच्या समस्या घेऊन आलेल्या मतदार संघातील लोकांना संबोधित करत होते.  त्यांनी परिसरातील लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि अनेक समस्या जागेवरच सोडवल्या आणि उर्वरित समस्या लवकर सोडवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 
जनसुनावणी दरम्यान, लोकांनी शेती , महसुल , वन, व भूमी अभिलेख संबंधित   समस्यांबाबत आमदारांना लेखी अर्ज सादर केले आणि त्या सोडवण्याची विनंती केली.  
जमा अर्ज प्रमाणे आमदार यांनी प्रत्येक व्यक्तीला बोलावून घेतले व त्याच्या समस्या जाणून अधिकाऱ्यांना त्या सोडविण्याचे सूचना करत होते त्यामुळे  बऱ्याच समस्या जागेवरच आमने-सामने  सुटल्या जात असताना दिसत होते. कामही वेगाने होत असल्याचे दिसत होते. आ. आशुतोष काळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जनतेच्या सामूहिक समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील याचा जनतेतील विश्वास निर्माण करण्यास सांगितले.  
आ.श्री. काळे  यांनी   मागील जनता दरबारात लोकांनी मांडलेल्या समस्येवर केलेल्या कारवाईच्या अधिकाऱ्यांना प्रगती अहवाल लवकर देण्यास सांगितले आहे जेणेकरून जनतेच्या समस्या लवकर सोडवता येतील.  त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, जर जनतेच्या समस्या सोडवण्यात काही तांत्रिक किंवा इतर समस्या असतील तर त्यांनी त्यांना त्याबद्दल कळवावे जेणेकरून ते वेळेवर सोडवता येतील.
यावेळी तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, .गटविकास अधिकारी संदीप दळवी, भूमी अभिलेख विभागाचे डावरे, वन विभागाचे सानप, शेती महामंडळाचे जोंधळे आदींसह अधिकारी उपस्थित होते

चौकट 

कार्यकर्ते सतत नेत्यांबरोबरच असतात  त्यामुळे कार्यकर्त्यांना नेत्याकडे आपल्या समस्या कधीही मांडता येतात त्यामुळे जनता दरबारात कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या घेऊन येण्यापेक्षा गर्दी न करता सर्वसामान्य जनतेला समस्या मांडून द्याव्यात- एक सुज्ञ नागरिक

  

Leave a Reply

You cannot copy content of this page