अतिक्रमणाबाबत प्रशासनाची मनमानी खपवून घेणार नाही -खा. भाऊसाहेब वाकचौरे

अतिक्रमणाबाबत प्रशासनाची मनमानी खपवून घेणार नाही -खा. भाऊसाहेब वाकचौरे

Will not tolerate the administration’s arbitrariness regarding encroachment – Kha. Bhausaheb Wakchoure

२२७ कोटीच्या टेंडरचा मलिदा खाण्यासाठीच अतिक्रमणाचा घाट -राजेंद्र झावरे

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!  , Sat15 Feb  17.00 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: अतिक्रमणासंबंधी मी प्रशासनाला सांगू इच्छितो की  मनमानी (सोमोटो) न करता लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अतिक्रमणाची कारवाई करावी अन्यथा मला वेगळा विचार करावा लागेल अशा शब्दात शिर्डीतील लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले,

   कोपरगाव येथे अतिक्रमणाबाबत शनिवारी दुपारी शिवसेना शहर कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते
खा. वाकचौरे पुढे म्हणाले मी दिल्लीला होतो आल्यानंतर मला अतिक्रमणाला विषयी मला कोपरगाव आणि नेवासा येथून अनेक फोन आलेत एकीकडे सरकार घर देते, रोजगार देण्याचा प्रयत्न करते परंतु जिल्हाधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी जर लोकांना उध्वस्त करत असतील तर ही अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे
 जिल्ह्यात हे का? आणि कशासाठी चालले?  याचं मला उलगडा होत नाही निवडणूक होऊ द्या, लोकप्रतिनिधींना कारभार हातात घेऊ द्या, ते ठरवतील पण आज सर्वच काही अधिकारी ठरवत असतील आणि लोकांना उजाड करीत असतील तर मला सुद्धा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा स्पष्ट इशारा खासदार वाकचौरे यांनी दिला 
  खा. वाकचौरे पुढे म्हणाले हे चालणार नाही आम्हाला लोकांनी कशासाठी निवडून दिले लोकांचे प्रश्न जर आम्हाला माहीत नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जर लोकांच्या सुखदुःखात सहभागी होता येणार नसेल तर आम्ही कशासाठी आहोत ?  ही प्रशासनाची मनमानी चालणार नाही कृपया हे अतिक्रमण थांबवा स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधी स्थानिक नगरसेवक असतील त्यांना विश्वासात घ्या अतिक्रमण जरूर काढा जिथे अडथळा होतो जिथे गरज आहे तिथेच अतिक्रमण काढा गरज नसताना जर अतिक्रमे काढाल तर असे चालू देणार नाही असे स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावले
 नेवाशाला सुद्धा लोक उपोषणाला बसले आहेत  सार्वजनिक बांधकाम खाते असो की नगरपालिका यांना मी सांगतो त्यांनी लोकांना विश्वासात घ्यावे अतिक्रमणाबाबत न्याय देण्यासाठी मी जिवाचे रान करेन.भले काहीही करावे लागले तरी चालेल पण तुमची  मनमानी मी चालू देणार नाही  असा गर्भित इशारा खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी यावेळी दिला. मात्र जिल्ह्यातील त्या त्या ठिकाणच्या स्थानिक स्थानिक आमदारांनी अतिक्रमणा बद्दलची  भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा खा. वाकचौरे यांनी शेवटी  व्यक्त केली. 
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले की, जिल्हाभर अचानक अतिक्रमांची मोहीम चालू झाली असली तरी  पण कोपरगावला मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागल्याने त्याच्या आत ठेकेदाराला रान मोकळे देऊन २२७ कोटीच्या मलनि:सारण टेंडरचा मलिदा खाण्यासाठीच अतिक्रमणाचा घाट घातला गेल्याचा  गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी प्रशासनावर केला आहे टेंडर प्रक्रियेवरच त्यांनी थेट संशय व्यक्त केला
 पुढे बोलताना श्री झावरे म्हणाले की  गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊन तुंबडी तुम्ही भरणार का?  मागेही १४१ कोटीच्या पाणी योजनेचे असेच तीन तेरा वाजले तुम्ही सत्ताधारी आहात कमिशन खा, नका खाऊ २२७ कोटीचे टेंडर गुजरातच्या ठेकेदाराला देण्यासाठी जर तुम्ही गोरगरिबांना उध्वस्त करणार असाल तर वेगळा विचार करावा लागेल असा थेट इशाराच त्यांनी दिला  
वाहतुकीला अडचण होती हे मान्य आहे लोक पुढे पुढे  सरकतात बांबू लाव टपऱ्याला कापड लाव,  इकडे तिकडे रस्त्यात हातगाड्या, पाल लावतात यामुळे वाहतुकीला अडचण होते अपघात होतात हे मान्य आहे ती अतिक्रमणे जरूर काढा  परंतु  गल्लीबोळात कशाला घुसता ? असं सवाल देखील त्यांनी पालिका प्रशासनाला केला आहे जे लोक ५० वर्षापासून तिथे राहतात त्यांच्या आजोबापासुन  तीन पिढ्यांची घरे असलेली तुम्ही आज पाडायला निघालात हे कशासाठी तर खासदार साहेब आम्हाला संशयाचा आहे हा सर्व अट्टाहास २२७ कोटीच्या कामातील मलिदा खाण्यासाठीच कोणाला आर्थिक उखळ पांढर करायचं असेल कोणाच्या तुंबड्या भरायचे असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही असा दणदणीत इशारा शेवटी राजेंद्र झावरे यांनी दिला. 
यावेळी  पत्रकार परिषदेत संदीप वर्पे संजय सातभाई कैलास जाधव आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते  

Leave a Reply

You cannot copy content of this page