शिवनेरी गडावर संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान
Sanjeevani Yuva Pratishthan’s cleanliness drive at Shivneri fort
यापुढे दरवर्षी एक गड स्वच्छता- विवेक कोल्हे
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! , Mon10 March 18.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्यासह गडकिल्ले स्वच्छता अभियानांतर्गत या वर्षी प्रथमच शिवनेरी गडावर दि.८ व ९ मार्च रोजी “स्वच्छता मोहीम” आयोजित करण्यात आली. शिवनेरी गडावर आयोजित या अभियानात प्रतिष्ठानच्या सव्वा 200 हून अधिक युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

महाराष्ट्राची अस्मिता व छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे स्वराज्यातील गडकिल्ले युवकांसाठी प्रेरणा व ऊर्जा देणारे आहेत असा विश्वास प्रतिष्ठानचे संस्थापक विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला. त्यांची स्वच्छता ही प्रत्येकाचे कर्तव्य आहे, किल्ल्यावर येणाऱ्या शिवप्रेमींना सुद्धा गड स्वच्छ ठेवण्यासाठी प्रेरित करण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवनेरी किल्ल्याची माहिती गाईड यांनी दिल्याने छत्रपती शिवरायांचा पराक्रम जाणून घेण्याची संधी मिळाली त्यामुळे ही दोन दिवसीय स्वच्छता मोहीम युवकांसाठी अभ्यास दौरा ठरला
गडावरील शिवाई देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन सुरू झालेल्या स्वच्छता अभियानात दत्त मंदिर परिसर, किल्ले शिवनेरी पायथा, हत्ती दरवाजा, उद्याने, अंबरखाना, शिवकुंज, शिवजन्मस्थळ या ठिकाणी स्वच्छता केली जाते. सोबत असलेल्या गाईड करून गडाची संपूर्ण माहिती जाणून घेतली यावेळी शाहीर मुकुंद भूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संघटन आणि नियोजन यावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले
प्रतिष्ठानचे संस्थापक विवेक कोल्हे यांच्यासह सव्वा 200 हुन अधिक सहभागी शिवप्रेमींनी गडावरून प्लॅस्टिक कचरा संकलित केला यावेळी प्रतिष्ठानच्या युवकांच्या हातात स्वच्छतेचे महत्त्व विशद करणारे व महिला सुरक्षा व सन्मान फलक गडावरील शिवप्रेमींना प्रोत्साहित करत होते आणि येथून पुढे दरवर्षी स्वराज्यातील गडकिल्ले जाणून घेण्याबरोबर स्वच्छतेसाठी प्रयत्नशील राहण्याची मनोदय व्यक्त करण्यात आला. यापूर्वी प्रतिष्ठानच्या वतीने शिवनेरी गडावर व रायगडावर स्वच्छता मोहीम राबवली होती.
Post Views:
50