कोपरगाव शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम थांबवाः  मविआ ऊद्या  पालिका कार्यालयावर धडकणार; 

कोपरगाव शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम थांबवाः  मविआ ऊद्या  पालिका कार्यालयावर धडकणार; 

Stop the encroachment removal campaign in Kopargaon city: Mavia Udya will attack the municipal office;

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!  , Mon19 Feb  18.30 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव शहरातील  अतिक्रमण हटविण्याचा मुद्दा तापण्याची संकेत प्राप्त झाले असून, आज गुरुवारी कोपरगाव शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम थांबवा या मागणीचे निवेदन देण्यासाठी महाविकास आघाडी  कोपरगाव नगरपालिका कार्यालयावर धडकणार आहे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना निवेदन देत त्यांच्याशी चर्चा करणार आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे 

गेल्या आठ दिवसापासून शहरातील अतिक्रमित व अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर गेले आठ दिवसापासून शहरातील मुख्य रस्ता एचडी विद्यालय रस्ता बँक रोड गुरुद्वारा रोड धारणगाव रोड येवला नाका  यासह अनेक भागात पालिकेने अनधिकृत बांधकामांवर रेखांकनाचे कामही  केले होते. संबंधित नागरिकांना नोटीसा देखील देण्यात आल्या आहेत. यात खासदार भाऊसाहेब वाकचौरे व आमदार आशुतोष काळे त्यांच्या पाठोपाठ  या प्रकरणात महाविकास आघाडीने उडी घेतली आहे.
बुधवारी(१९) शिवजयंतीच्या निमित्ताने इंदिरा शॉपिंग शिवसेना शहर कार्यालयात उद्धव ठाकरे शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख राजेंद्र झावरे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष संदीप वर्पे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव माजी नगराध्यक्ष संजय सातभाई शहर प्रमुख सनी वाघ, माजी नगरसेवक बबलू वाणी, पप्पू पडियार, रंजन जाधव, राहुल देशपांडे यासह पदाधिकारी यांच्यात बैठक घेऊन अतिक्रमण थांबवा निवेदन मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे निश्चित करण्यात आले. 
निवेदनामध्ये कोपरगाव शहरात महाराष्ट्र शासन व नगरपरिषदेच्या वतीने अन्यायकारक अतिक्रमण मोहीम सुरु आहे त्या संदर्भात अतिक्रमण विरोध मोहिमेस तूर्तास स्थगिती मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे आज गुरुवारी (२०) महाविकास आघाडीच्या वतीने
मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे यासाठी  महाविकास आघाडीचे पदाधिकारी, मित्रपक्ष,कार्यकर्ते, इतर सामाजिक संघटना तसेच अतिक्रमण बाधित नागरिकांनी सकाळी  ठीक १०:३०वा. इंदिरा शॉपिंग सेंटर (विघ्नेश्वर चौक)कोपरगाव या ठिकाणी जमावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page