कोपरगावात कोल्हे परिवाराच्या वतीने आयोजित रामकथेस उत्साहात प्रारंभ…..! 

कोपरगावात कोल्हे परिवाराच्या वतीने आयोजित श्रीरामकथेस उत्साहात प्रारंभ…..! 

The Sri Ram Katha organized by the Kolhe family in Kopargaon began with enthusiasm…..!

सहकार वर्षी शंकरराव कोल्हे तृतीय पुण्यस्मरण १६ मार्च ते २२ मार्च श्रीराम कथा 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!  , Mon17 March  18.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :- सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त.  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हेविचारधारा ट्रस्ट व संजीवनी उद्योग समुह, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या  वतीने  ज्ञानेश्वरनगर तहसिल कार्यालय मैदान कोपरगांव येथे आयोजित  श्रीराम कथेस कोल्हे परिवार यांच्या संयोजनाने रविवारी १६ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भव्य दिव्य मिरवणुकीने उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

ह भ प साध्वी सोनालीदीदी कर्पे यांचे पूजन करताना विवेक कोल्हे व सौ रेणुका कोल्हे
रविवार १६ मार्च पासून ते २२ ह भ प साध्वी सोनालीदीदी कर्पे, कल्याण स्वामी संस्था चकलंबा बीड यांच्या सुश्राव्य वाणीतून मार्चपर्यंत सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सात दिवस संगीतमय श्रीराम कथा चालणार आहे. रविवारी २३ मार्च रोजी सायंकाळी ७ ते ८.३० वाजता काल्याचे किर्तन होणार असून रात्री साडेआठ वाजता महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आले आहे. 
मिरवणुकीत मंगल कलश घेऊन येताना सौ स्नेहलता कोल्हे व सौ रेणुका कोल्हे व महिला दिसत आहे

कथेच्या पहिल्या दिवशी फुलांनी सजविलेल्या बग्गीतून साध्वी सोनालीदीदी कर्पे यांची कोपरगाव बस स्थानक परिसर हृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे स्मारक चौकातून प्रसन्नमय भक्तीपूर्ण वातावरणात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली बग्गीच्या पुढे डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या कुमारीका महिला दुतर्फा चालत होत्या रंगीबेरंगी फुलांची उधळण,फटाक्यांची आतिषबाजी सनई चौघडा मंगलमय निनादात तल्लीन होऊन नाचणारे रामभक्त  अशी ही  सवाद्य मिरवणुक ज्ञानेश्वर नगरीत पोहचल्यानंतर भव्य दिव्य व्यासपीठावर राम कथेच्या पहिल्या पुष्प गुंफण्याची सुरूवात झाली आहे.                     

पहिले पुष्प

                   

 
सोनाली दीदी कर्पे यांनी यांनी कथेच्या पहिल्या दिवशी जीवनाची सुरूवात आणि शेवटही राम नामानेच आहे, मधल्या प्रवासात राम आठवला तर आराम आहे नाही आठवला तर हराम आहे.                       
राम एक वचनी-एकबाणी – एक पत्नी मर्यादापुरुषोत्तम होते तर रावण बुध्दीवंत, किर्तीवंत, महादेवभक्त, शौर्यवान, धैर्यवान होता पण तो अधर्माने वागला, त्याची नजर व्यवहार वृत्ती चांगली नव्हती म्हणून रामाला त्याचा वध करावा लागला.               
रावणाची पत्नी मंदोदरी अत्यंत पतिव्रता होती पण तिच्या नशीबी पतीचं दुःख होतं. दशमुख (रावण) आणि दहा इंद्रियांच्या रथावर स्वार होवुन धर्माचे आचरण करणारा दशरथ या दोन व्यक्तीरेखांची ओळख रामायणांत होते.                                 
आज प्रत्येकाची मनं साभोवतालच्या वातावरणांमुळे गढूळ झाली आहे, माणूस मन आणि माणूसपण हरवत चालला आहे, कलीयुगात आज घराघरात महाभारत सुरू आहे, सासू-सुन, नणंद-भावजय, भाउ-भाउ आदि नाती शत्रुसारखे जगत आहेत हा शत्रुपणा दुर करण्याची शिकवण श्रीरामकथा देते, ती गंगेसारखी पवित्र आहे त्यात कितीही डुबक्या मारल्या तरी प्रत्येकवेळेस नव-नविन विचाराचं प्रसारण त्यातून होतं. त्रेतायूगापासून सुरू असलेले रामायण अद्यापही जुने झालेले नाही. व्यवहार, कृती, जीवन कसं जगावं याची शिकवण रामायणातुन मिळते, देशाची ओळख राम आहे  पण आपण ती विसरत चाललो आहे.    
 जन्माला कुठं यायचं हे आपल्या हातात नाही पण जन्माला आल्यानंतर ठसा उमटवणं आपल्या हातात आहे त्यात माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे नांव अग्रभागी आहे. ते कर्तृत्ववान, संघर्षशील, जनसेवेचे वारकरी, राज्याच्या राजकारणांतील विकासपुरूष, धैर्यशील, शेती आणि पाणी या घटकासाठी त्यांनी उभं आयुष्य खर्ची घालत  संघर्षातुन संजीवनी नावाचं साम्राज्य उभं करत अनेकांचे संसारप्रपंच फुलविले, भविष्याच्या दूरदृष्टीतून ४३ वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई-पुणे-चेन्नई येथे मिळणारे अभियांत्रीकी तांत्रीक व्यावसायिक दर्जेदार शिक्षणाच्या सोयी केल्या, असे गौरव उद्गार –  सोनालीदिदि कर्पे यांनी यावेळी व्यक्त केले

कार्यक्रमस्थळी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या चित्ररूपी विकासाची छायाचित्रे, रामायणातील चित्रीत केलेले मुख्य प्रसंग, अयोध्येतील हुबेहुब श्रीरामाची प्रतिकृती अनेकांचे लक्ष वेधुन घेत होती.

बिपिन दादा कोल्हे व सौ स्नेहलता कोल्हे स्वागत करताना

प्रारंभी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे,सौ.कलावतीताई कोल्हे,संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयुटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,कोपरगांव तालुका स्वयंसहायता महिला बचतगटाच्या अध्यक्षा सौ.रेणुका कोल्हे,सौ.श्रद्धा कोल्हे आदींची उपस्थिती होती.

यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते रामायण ग्रंथ व साध्वी सोनालीदिदी कर्पे यांचे विधीवत पुजन करण्यांत आले.स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ नेते दत्तूनाना कोल्हे,सुरेशअंकल कोल्हे, व्हा.चेअरमन राजेंद्र कोळपे यांनी केले.

संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ह.भ.प.स्व.गणपत महाराज लोहाटे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टचे उपाध्यक्ष मच्छिंद्र टेके यांनी केले

Leave a Reply

You cannot copy content of this page