आत्मिक श्रद्धेशिवाय श्रीराम कथेची गोडी नाही – साध्वी सोनालीदिदी कर्पे.

आत्मिक श्रद्धेशिवाय श्रीराम कथेची गोडी नाही – साध्वी सोनालीदिदी कर्पे.

Without spiritual faith, the story of Shri Ram has no sweetness – Sadhvi Sonali Didi Karpe.

श्रीराम कथेचे दुसरे पुष्प गुंफताना

छत्रपती शिवरायांची मॅनेजमेंट गुरु म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! , Tue18 March  18.00 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगांव : मानवी जीवनाचा प्रवास खडतर आहे, पण परमेश्वरी सेवेतुन त्यातील अडचणींवर उपाय सापडतो, पती-पत्नी हे विश्वासाचं नातं आहे, प्रत्येकाला वाटतं देवाने आपल्या घरी यावं पण त्यासाठी श्रध्देची प्रतिक्षा महत्वाची असते, कोपरगांव शहर आणि तालुका हा अनेक संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असुन गोदावरी नदी काठी श्रीरामकथा होत आहे हे तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे, आत्मिक श्रद्धे शिवाय श्रीराम कथेची गोडी नाही. असे प्रतिपादन साध्वी सोनालीदिदी कर्पे यांनी केले,

कोपरगावकरांना कोल्हे परिवार व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट व संजीवनी उद्योग समुह, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या  माध्यमातून व उत्तम नियोजनामुळे ह भ प साध्वी सोनालीदीदी कर्पे  यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीराम कथा श्रवणाची पर्वणी प्राप्त झाली आहे. त्यामुळे भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने उच्चांकी गर्दी होत असल्याने उभारण्यात आलेला भव्य मंडप कमी पडत आहे. आयोजकाना बैठक व्यवस्था वाढवावी लागण्याचे संकेत आहेत.
     

ईशान कोल्हे व श्रद्धा कोल्हे श्रीराम कथेत पूजन करताना

                                         

शहरातील संत ज्ञानेश्वरनगरी तहसिल कार्यालय मैदानावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या तिस-या पुण्यतिथीनिमीत्त आयोजित श्री राम कथेच्या दुसऱ्या दिवशी  साध्वी सोनालीदिदी कर्पे  बोलत होत्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम कथेतून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य पराक्रमाची माहिती देऊन मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची उभारणी केली महाराजांनी महाराष्ट्र राज्याचे अस्मिता कायम ठेवत  स्वाभीमानाची शिकवण दिली. मॅनेजमेंटचे गुरू म्हणून त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असुन युवकांनी त्यांचा वारसा पुढे चालवावा, असे सांगून त्या पुढे म्हणाला की, सहजच कधी माणसं मोठी होत नाही तर ती विचाराने मोठी होतात त्यात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा उल्लेख केल्यास वावगे ठरू नये. कोपरगांवकरांना कुटूंब मानत त्यांची आयुष्यभर सेवा केली, स्वकर्तृत्वावर त्यांनी देश-विदेशातही साखर उद्योगात आधुनिक बदलांची शिकवण देत शेतकरी वर्गासह त्यावर अवलंबुन असणा-या अनेक छोटया छोटया घटकांची काळजी घेतली म्हणूनच त्यांचा सर्वत्र जयघोष आहे., व्यक्ती देह सोडुन गेला तरी त्याच्या कार्य-कर्तृत्वांचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो.                प्रारंभी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्थ सुमित कोल्हे यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पुतळयास पुष्पहार अर्पण करून विधिवत पुजन करण्यांत आले, सौ. श्रध्दा व ईशान कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून रामायण ग्रंथ व साध्वी सोनालीदिदी कर्पे यांचे पुजन केले.

 सुदर्शन महाराजांच्या झाकीने श्रीराम जन्माचा जीवंत देखावा यावेळी सादर करण्यांत आला. ताला-सुरांत व लयबध्दतेंने साध्वी सोनालीदिदी कर्पे यांच्या राम महाराज लाहुडकर (बासरी), गोपाल महाराज मोहे (सिंथेसायझर), सोपान महाराज पारसे (शहनाई), वैभव महाराज पांचाळ (तबला), रितेश महाराज पाटील (अपपॅड), उमेश महाराज पांचाळ (ढोलक), भालीकाताई भगत (मृदुंग) संगीत समुहांने बहारदार साथ दिली तर अन्नपुर्णमाता महिला वारकरी शिक्षण संस्था चकलंबाच्या ज्ञानेश्वरीताई म्हसे, अपेक्षाताई पवार, राधीकाताई घुगे यासह अन्य विद्यार्थीनींनी गोड आवाजात रामकथा संगीतमय भजने गायली. महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. शेवटी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सेवकांनी राम जन्माबददल उपस्थितांना खडीसाखरेचा महाप्रसाद वाटप केला. अवकाशात बहारदार फटाक्यांची आतषबाजी करण्यांत आली. पुरूषांनी पिवळया पोषाखात तर महिलांनी पिवळया साडीत फेर धरून नाचत फुगडया खेळत रामजन्माचा मनसोक्त आनंद लुटला.

Leave a Reply

You cannot copy content of this page