चाळीस आदिवासी कुटुंबीयांचा  रहिवास प्रश्न स्नेहलता कोल्हे यांनी कौशल्याने मिटविला; 

चाळीस आदिवासी कुटुंबीयांचा  रहिवास प्रश्न स्नेहलता कोल्हे यांनी कौशल्याने मिटविला; 

Snehlata Kolhe skillfully resolved the housing issue of forty tribal families;

बिऱ्हाड आंदोलन शमले, टांगती तलवार हटली; आता आदिवासी बांधवांना मिळणार हक्काची सरकारी जमीन

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!  , Mon 24 March  18.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारात चूल बांधून सुरू असलेले बि-हाड आंदोलनाचा  प्रश्नी  मध्यस्थी करतांना तहसीलदार , गट विकास अधिकारी व एकलव्य संघटनेचे नेते यांच्याबरोबर तब्बल दोन तास केलेल्या चर्चेतून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आठ दिवसापासून सुरू असलेला  व बिकट बनत चाललेला  कोपरगाव मतदारसंघातील आदिवासी रहिवास पुनर्वसन प्रश्न मध्यस्थी करून मोठ्याकौशल्याने  मिटविला असून यामुळे आता आदिवासी बांधवांना हक्काची राहण्यासाठी सरकारी आदिवासी जमीन मिळणार आहे  हे त्यांनी केलेल्या आंदोलनाचे मोठे यश आहे अशा भावना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आंदोलन महिलांना दिलासा देताना व्यक्त केल्या

विस्थापित होण्याच्या भीतीने ३८ ते ४० डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या भर उन्हात १७ मार्चपासून तहसील कार्यालयाच्या आवारात एकलव्य संघटनेचे उत्तम पवार व निलेश ठाकरे मार्गदर्शनाखाली चुल मांडून ४० आदिवासी अबाल वृद्ध कुटुंबीयांनी बिऱ्हाड आंदोलन सुरू केले होते. दिवसागणिक या आंदोलनाची तीव्रता वाढत असताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी बिकट बनत चाललेली परिस्थिती  मोठ्या कौशल्याने  हातळली. 
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी थेट आदिवासी कुटुंबाची भेट घेऊन तहसीलदार महेश सावंत व गट विकास अधिकारी संदीप दळवी याच बरोबर आदिवासी नेते उत्तम पवार व निलेश ठाकरे या दोन्ही वरिष्ठ नेत्यांसोबतची तब्बल दोन तास चर्चा करून आणि प्रशासनाकडून  मिळालेला शब्द यामुळे बिऱ्हाड आंदोलन  शमले आहे. यामुळे पाटबंधारे खात्याच्या जागेवर अतिक्रमण असलेल्या व नोटीसा दिलेल्या आदिवासी बांधवांना बेघर व विस्थापित होण्याचा बसणारा फटकाही टळला आहे. एवढेच नव्हे तर अनेक वर्षापासून पाटबंधारे खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण असल्याने कायम भरवशावर असलेल्या आदिवासी बांधवांना स्वतःची आदिवासी असलेली सरकारी जमीन शोधून मिळाली आहे त्यामुळे त्यांच्या मानेवर असलेली अतिक्रमणाची टांगती तलवार दूर झाली आहे.
 
यावेळी बोलताना स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तहसील आवारातील आदिवासी बांधवांचे बिऱ्हाड आंदोलन  सुटले,असून आता आदिवासी पट्ट्यातील जमिनीवर  पुनर्वसन हे या आंदोलनाचे मोठे यश आहे  शंकरराव कोल्हे यांनी आदिवासी  बांधवांना हिंगणे ला जमीन मिळवून दिली बऱ्याच ठिकाणी खावटी कर्ज गाई म्हशींचे वाटप रोजंदारीसाठी मालवाहतूक गाड्या आदिवासी बांधवांनी शिकावं आदिवासी मुलगी हवाई सुंदरी व्हावी त्यांना शासनाच्या सगळ्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी  स्वतंत्र विभाग उभारून प्रयत्न केले आज  माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे  यांची ९६ वी जयंती आहे जणू काही हा तिढा स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या आशीर्वादानेच  मिटतोय असे मी आजच्या दिवशी मानते. अशा ओथंबलेल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले, रिपाई चे जितेंद्र  रणशूर हेही उपस्थित होते.

चौकट

 यावेळी स्नेहलता कोल्हे यांनी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करून पुढाकार घेत आदिवासी कुटुंबांना पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे असे आश्वस्त केले. शासन स्तरावर आणि प्रशासनाला पाठपुरावा करून नवीन जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन चर्चेदरम्यान दिले. त्याच वेळी प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसादामुळे आंदोलकांनी आपले उपोषण मागे घेतले आणि एकमेकांना पेढे भरवत आंदोत्सव साजरा केला.

 
  

Leave a Reply

You cannot copy content of this page