लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून अडीच कोटी कामाला प्रशासकीय मान्यता
Administrative approval for Rs 2.5 crore work under Lokshahir Annabhau Sathe Urban Settlement Improvement Scheme
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! , Wed 26 March 19.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२३-२४ अंतर्गत कोपरगाव शहरातील विविध विकास कामांच्या २.६० कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवत केलेल्या विकास कामांमुळे कोपरगाव शहराचा कायापालट झाला असून शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी आ.आशुतोष काळे यांचा शासन स्तरावरील पाठपुराव्यातून शहरातील जीवनमानात सुधारणा झाली आहे पुढेही नागरिकांना अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यामध्ये कोपरगाव नगर परिषद हदीतील प्रभाग क्र.०१ मध्ये रस्ता कॉक्रीटीकरण व भुमिगत गटार करणे, अमोल पवार घर ते साक्षी किराणा परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र.७ मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे, पाठक घर ते कासलीवाल कंपाऊंडपर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र.८ मध्ये भुमिगत गटार करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र.१० मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे, रस्ता डांबरीकरण करणे, रस्ता साईडपट्टीस पेव्हर ब्लॉक बसविणे आदी कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील कामांचा समावेश आहे.
कोपरगाव शहराच्या विकासकामांना निधी मंजूर केल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे.