काकडी विमानतळ नाईट लँडिंग विमान सेवा जिल्हयाच्या विकासात भर-विवेक कोल्हे
Kakdi Airport Night Landing Flight Service Focuses on District Development – Vivek Kolhe
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! , Mon 31 March 18.50 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगांव :तालुक्यातील काकडी येथे शिर्डी विमानतळ उभारले असुन तेथे गुढीपाडव्याच्या मुहूर्त पासून नाईट लँडिंग विमानसेवा सुरु झाली हा अहिल्यानगर जिल्हा विकासाचा महत्वाचा टप्पा असून मोलाची भर असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे.
साईबाबा शिर्डी हे आंतरराष्ट्रीय धार्मीक देवस्थान असुन तिरुपती बालाजी नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अहिल्यानगर जिल्हयातील शेतकरी वर्गासह अन्य व्यवसायिकांना आता काकडी विमानतळावर नाईट लँडिंग विमानसेवा सुरु झाल्यामुळे देशासह अन्य ठिकाणी कुठेही माल पाठविता येईल शिवाय प्रवास सुविधाही उपलब्ध झाली आहे ही बाब मोठी आहे.
साईबाबा संस्थांनचे तत्कालीन अध्यक्ष स्व. जयंत ससाणे, व तत्कालीन उपाध्यक्ष माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व सर्व विश्वस्त मंडळ यांनी काकडी साईबाबा शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी सातत्यांने पाठपुरावा केला. सहकारक्षेत्रात साखर कारखानदारीबरोबरच अन्य क्षेत्रात अहिल्यानगर जिल्हयाचे विशेष योगदान आहे. शेती, शेतकरी विकासात येथील कर्तबगारी नावलौकीकास्पद आहे जिल्हयाच्या अर्थकारणांत काकडी विमानतळ नाईट लँडिंग सेवा सुरु झाल्याने समाधान आहे. शिर्डी, राहाता , अस्तगाव परिसरात गुलाब फुलांची शेती मोठी आहे त्याचबरोबर द्राक्ष,
फळफळावळ आदि नगदी पिकांत येथील शेतकऱ्यांची कामगिरी नांवलौकीकास्पद आहे. शेती- शेती पूरक उत्पादने हवाई वाहतुकीने देशाच्या अन्य भागात पाठविण्याची सुविधा यामाध्यमांतून भविष्यात उपलब्ध होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागात नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग यशस्वी करून दाखवला आहे त्याचाही लाभ मोठ्या प्रमाणात होत आहे, शिर्डी भोवती रस्ते विकासाचे जाळे शेती अर्थकारणासाठी मजबूत झाले आहे, एन एच 160 हायवेचे कामही अंतिम टप्प्यात आहे हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे विवेक कोल्हे म्हणाले.