कोपरगावमध्ये पाडवा पहाट (गुढी पाडवा) सुरमयी गीतांनी साजरा
Padwa Pahat (Gudhi Padwa) celebrated with melodious songs in Kopargaon
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! , Mon 31 March 19.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव कोपरगावमध्ये पाडवा पहाट (गुढी पाडवा) 30 मार्च रोजी साई गाव पालखी सोहळ्याचे निमित्ताने मुंबादेवी तरुण मंडळ ज्येष्ठ नागरिक सेवा मंच ज्येष्ठ महिला समिती व शारदा संगीत विद्यालयाच्या वतीने भक्ती गीत भावगीत देशभक्तीपर अशा सुरमयी गीतांनी मोठ्या उत्साहात श्री संत ज्ञानेश्वर नगरी येथे साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी सहकारमहर्षी माजीमंत्री कै शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, सौ. रेणुका कोल्हे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पा काळे, उद्योजक कैलास शेठ ठोळे, मंचच्या अध्यक्षा सौ सुधाभाभी ठोळे, रजनी गुजराथी, कार्याध्यक्ष विजय बंब, ऊत्तम भाई शहा डॉ विलास आचारी, चार्टर्ड अकौंटंट नितीन डोंगरे, शांताराम केकाण आणि शहरातील संगीतप्रेमी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
33