धार्मिक ज्ञानदानात मुंबादेवी- साईगाव पालखीचा राज्यस्तरीय नांवलौकीक-विवेक कोल्हे.

धार्मिक ज्ञानदानात मुंबादेवी- साईगाव पालखीचा राज्यस्तरीय नांवलौकीक-विवेक कोल्हे.

State-level nom-nom of Mumbadevi-Saigaon palanquin in religious knowledge-Vivek Kolhe.

साध्वी अनुराधा दीदी पंढरपूरकर यांच्या रसाळ वाणीतून श्री शिवमहापुराण कथा

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!  , Mon 31 March  19.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगांव: एकतीस वर्षापासुन धार्मिक ज्ञानदानात मुंबादेवी तरुण मंडळ साईगाव पालखीचा राज्यस्तरीय नांवलौकिक असून अध्यात्म संस्काराचा ठेवा-शिकवण आणि श्रद्धा सबरीची जपवणूक ते करतात असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.

           ज्ञानेश्वरनगरी तहसिल कार्यालय मैदान कोपरगांव येथे मुंबादेवी तरूण मंडळ साईगाव पालखी सोहळ्यानिमीत्त साध्वी अनुराधा दीदी पंढरपूरकर यांच्या रसाळ वाणीतून श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन केले, त्याचे विधीवत पुजन कोपरगांव तालुका महिला स्वयंसहाय्यता बचतगटाच्या अध्यक्षा सौ. रेणुका व विवेक कोल्हे या उभयतांच्या हस्ते झाले होऊन गुढी उभारण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते.
           
 प्रारंभी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, माजी नगराध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे उद्योजक कैलास ठोळे यांच्या हस्ते महिला बाईक रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली यात शहरासह तालुक्यातील, विविध सामाजिक संघटनांच्या महिला भगिनी अधिकारी पदाधिकारी यासह असंख्य महिलांनी नऊवारी साड्या परिधान करत सहभाग नोंदवला. याप्रसंगी नितीन डोंगरे, विजय बंब, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या अध्यक्ष सुधाभाभी ठोळे, रजनी गुजराथी, योगतज्ञ उत्तमभाई शहा, सुनील फंड, मुंबादेवी तरुण मंडळाचे सर्व तोलामोलाचे साई सेवक, संतोष चव्हाण, श्रीकांत जोशी आदी मोठ्या संख्येने हजर होते.
           श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, अध्यात्मसेवा सुरू करून ती टिकवणे ही अलौकिक  बाब आहे. त्यात मुंबादेवी तरुण मंडळ साईगाव पालखीचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा ठेवा राज्याबरोबरच देश विदेशात जाईल. श्रद्धा सबुरी एकात्मतेचा संदेश देणारे श्री साईबाबा त्यांचे संस्कार, घरोघर नेल्या जाणाऱ्या साईपादुका शिस्तबध्द संचलन, रामनवमी उत्सवात कोपरगाव ते आंतरराष्ट्रीय देवस्थान श्री साईबाबा शिर्डी साईगाव पालखीला भाविकांची अलोट होणारी गर्दी, सूत्रबद्ध नियोजन, स्वच्छतेचा संदेश आणि धार्मिक अध्यात्मिक कथा -श्रवणांतून दिली जाणारी संस्कार शिदोरी मोठी आहे. आजच्या तरुण पिढीला हा मार्गदर्शनाचा ठेवा आहे.  कोपरगाव बेट भागातील गुरु शुक्राचार्य संजीवनी मंत्र गोदावरी नदी तीरावर शिव महापुराण कथा संपन्न होणे हा आपल्या अध्यात्म पुण्याईचा मोठा वाटा आहे.   या उपक्रमास माजीमंत्री स्व शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग संग्रहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे सहकार्य सुरूच असल्याचे ते शेवटी म्हणाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page