कोपरगाव शहराच्या प्रमुख रस्त्यांसाठी ६ कोटी निधी वर्ग  – आ. आशुतोष काळे

कोपरगाव शहराच्या प्रमुख रस्त्यांसाठी ६ कोटी निधी वर्ग  – आ. आशुतोष काळे

 वत्तवेध ऑनलाईन | 29 Aug 2020, By:Rajendra Salkar 17.05

 कोपरगाव : कोपरगाव शहराच्या खराब झालेल्या प्रमुख रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या प्रयत्नातून १४ व्या वित्त आयोगातून ६ कोटी रुपये निधी  नगरपरिषदेच्या खात्यात जमा झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

मागील सहा महिन्यापासून उदभवलेल्या कोरोना विषाणूच्या महामारीमुळे निधी मिळण्यात अडचणी असतांना देखील शासनाकडून कोपरगाव शहराच्या रस्त्यांसाठी १४ व्या वित्त आयोगातून सहा कोटी रुपये निधी मिळाला आहे. मिळालेल्या या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करून दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहेत.सध्या संपूर्ण देशभर कोरोना संकटाने थैमान घातले असून सर्वच प्रकारच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्यास अवधी लागत आहे. मात्र कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी मिळावा यासाठी शासनस्तरावर यापुढेही जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

           चौकट – कोपरगाव  शहरातील अनेक प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारा निधी मिळविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांचे वेळोवेळी सहकार्य होत असल्यामुळे शहरविकासाची कामे मार्गी लागत आहेत.

-प्रशांत सरोदे मुख्याधिकारी 

Leave a Reply

You cannot copy content of this page