दिलासादायक कोपरगावात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९ .१५ टक्के

दिलासादायक कोपरगावात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९ .१५ टक्के

वृत्तवेध ऑनलाईन | 28 Aug 2020, By : RajendraSalkar 17:10

कोपरगाव : कोपरगावात शनिवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९ . ५६ टक्के हे दिलासादायक आहे. तर कोरोना ग्रस्तांचे प्रमाण केवळ २०. ०९ टक्के कोरोनाने मृत्यू झालेले यांचे प्रमाण केवळ १.९३ टक्के इतकी आहे. गुरूवारी कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये १६६ रुग्णावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

कोपरगाव कोरोना अपडेट : आज पर्यंत एकूण बाधित ८२५, आज पर्यंत बरे झालेले रुग्ण ६५३ ,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.१५ %,सद्यस्थितीत ॲक्टिव रुग्णसंख्या १६६ एकूण मृत्यू १६ मृत्यूचे प्रमाण १.९३%
गांधीनगर गोरोबा नगर महादेव नगर या भागात शीघ्रकृती कार्यक्रम (Rapid Action Plan) नियमितपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत
भागातील १७२९ घरातील ९७०० लोकांचा सर्वे करण्यात आला यात ८१ जणांची चाचणी केली असता ६ जण पॉझिटिव निघाले असून ७५ जण निगेटिव्ह आले आहेत.
शनिवारी सकाळी १८१ जणांच्या नमुन्याची रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली. यात २३ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर १५८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ४२ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. २९ जणांचे नमुने तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले आहेत.
शनिवारी दिवसभरात २३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असे डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.

२३ पॉझिटिव्ह रुग्णात : गांधीनगर ३, खडकी १, धारणगाव रोड १, सोनेवाडी १, सप्तर्षी मळा ४, भारत प्रेस रोड १, कोळपेवाडी १, बहादरपूर १, पोहेगाव १, लक्ष्मी नगर १, इंदिरा पथ १, निवारा १, येवला रोड १, धारणगाव १, टिळक नगर १, दत्तनगर २, गोरोबा नगर १ यांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.

ठळक बाबी… आतापर्यंत कोपरगाव तालुक्यात ३ हजार ९४४ व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट यात ८२५ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तर ३ हजार ११९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, आतापर्यंत १६ जणांचे कोरोनाने बळी घेतले.तर ६५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page