कोपरगाव महिला सेनेकडून योगी सरकारला चोळी बांगड्यांचा आहेर
वृत्तवेध ऑनलाइन।Wed Oct7,2020
By: RajendraSalkar,1.30
कोपरगाव : हाथरसच्या घटनेवरून कोपरगाव महिला शिवसेनेने शनिवारी योगी सरकारवर हल्ला केला आहे. उत्तर प्रदेशमधील महिलांवरील अत्याचारांच्या नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे राज्य तसेच केंद्र सरकारचे अपयश दिसून येते, असा आरोप कोपरगाव शिवसेनेने करून योगी सरकारला चोळी बांगड्याचा आहेर केला आहे.
हायलाइट्स:
हाथरस प्रकरणावरून शिवसेनेने उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर हल्ला केला
जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले, सुशांतसिंग राजपूत ची आत्महत्या आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणारे वाचाळवीर आता कुठे गेले? महिलावर अत्याचार झाल्यानंतर ऊठसूट चोळी बांगड्या देणाऱ्या स्मृती इराणी यांनी योगी सरकारला चोळी बांगड्या का दिल्या नाही ? त्यांचे पैसे संपले आहेत का ?असा महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे यांनी केला. पालघर येथील साधूंच्या हत्याकांडा विषयी पुढाकार घेणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात नराधमांना कायद्याचा धाक उरला नाही तेव्हा त्यांनी त्यांच्याच राज्यातील माता- भगिनींच्या सुरक्षेवर लक्ष द्यावे असा टोला शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी लगावला.
उत्तर प्रदेश योगी सरकारच्या निषेधाचे निवेदन कोपरगाव तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सपना मोरे नगरसेविका वर्षा शिंगाडे, अश्विनी होने, राखी विसपुते, सारिका कुहिरे, सविता साळवे, सुरेखा कानडे, गायत्री मोरे, तनुजा वाणी, छाया वाणी, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, एसटी कामगार सेना अध्यक्ष भरत मोरे विकास शर्मा, आकाश कानडे, बाळासाहेब साळुंके आदी शिवसैनिक उपस्थित होते.