जेलरला पाचशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
वृत्तवेध ऑनलाईन | 12 Oct 2020,
By: Rajendara Salkar 20.30
कोपरगाव : चाप्टर केस बंद करण्याकरीता मागितलेल्या लाचेप्रकरणी कोपरगाव तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक व कारागृहाचे जेलर रविंद्र नारायण देशमुख (वय ४८) यांना पाचशे रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडून अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी दिली.
या प्रकाराने महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याआधी दोन तलाठ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले होते.
याबाबतची अधिक माहिती अशी
तक्रारदार पुरुष,(वय-३५), रा. पढेगाव ता. कोपरगाव अहमदनगर आरोपी- रविंद्र नारायण देशमुख वय. ४८ फौजदारी लिपिक (जेलर) तहसील कार्यालय कोपरगाव जिल्हा.अहमदनगर वर्ग-३ यांनी पाचशे रुपये लाचेची मागणी- केली. तक्रारदार यांचेवर कोपरगाव तालुका पो.स्टे ला दारूबंदीचा गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यात तक्रारदार यांचेवर तहसिलदार कार्यालयात चॅप्टर केस पाठवण्यात आली होती. सदर चॅप्टर केस बंद करण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे ५००/- रु. ची लाचेची मागणी करुन ती दि. १२/१०/२०२० रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे पंच साक्षीदारांची समक्ष स्विकारली. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
या पथकात उज्ज्वल पाटील पोलीस निरीक्षक ला.प्र.वि, नाशिक,सह अधिकारी – पोनि. मृदुला नाईक ला.प्र.वि नाशिक सापळा पथक – पोहवा. कुशारे, पोहवा. गोसावी, पो ना महाजन , पोना. बाविस्कर,पोना. शिंपी लाप्रवि नाशिक यांचा समावेश आहे
नाशिक लाच लुचपत परिक्षेत्राचे विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक निलेश सोनवणे , अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
दिनकर पिंगळे पोलीस उप अधीक्षक वाचक नाशिक,आरोपीचे सक्षम अधिकारी तहसिलदार योगेश चंद्रे कोपरगाव यांचे समक्ष कारवाई करण्यात आली. या जेलर विषयी अनेक लोकांच्या तक्रारी होत्या. अखेर त्याचा घडा भरला व त्याला अटक करण्यात आली.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक टोल फ्रि क्रं.१०६४ येथे कळवावे असे आवाहन पोलिस निरीक्षक मृदुला नाईक यांनी केले.