अपंग संस्थेसमोरील कचरा हटवा; अन्यथा नगरपालिकेच्या दारात टाकू – आढाव
वृत्तवेध ऑनलाईन | 12 Oct 2020,
By: Rajendara Salkar 17.00
कोपरगाव : येथील कोपरगाव तालुका अपंग औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेचे प्रवेश द्वार, संरक्षक भिंती समोर कोपरगाव नगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कचरा साठवला असल्यामुळे या परिसरातील आरोग्य धोक्यात आले आहे, तेव्हा नगरपालिकेने हा सर्व कचरा त्वरित उचलून त्याची विल्हेवाट लावावी अन्यथा हा सर्व कचरा नगरपालिकेच्या दारात टाकावा लागेल असा इशारा अशी मागणी अध्यक्ष बाळासाहेब रावसाहेब आढाव यांनी केली आहे.
ते म्हणाले की, सध्या कोरो ना महामारी चा संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील टेलिफोन टॉवर कोपरगाव भूमापन कार्यालयाशेजारी सिटी सर्वे नंबर 1998 मध्ये कोपरगाव तालुका अपंग औद्योगिक सहकारी संस्थेचे कार्यालय सुसज्ज पद्धतीने बांधण्यात आलेले आहे. या टिळकनगर भागातील कचरा, अन्य घाण याची नगरपालिके च्या आरोग्य स्वच्छता कर्मचाऱ्यांनी विल्हेवाट लावणे गरजेचे असताना सदरचा संपूर्ण कचरा हा कोपरगाव तालुका औद्योगिक अपंग संस्थेच्या संरक्षक कंपाऊंडला टाकला आहे, अपंग औद्योगिक सहकारी संस्थेच्या प्रवेशद्वारावरच त्याचा मोठ्या प्रमाणात ढीग घiलण्यात आला आहे. त्यामुळे येथील आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिका आरोग्य विभागाचे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी याची तातडीने अन्यत्र विल्हेवाट लावावी अन्यथा सदरचा केर कचरा घाण नाइलाजास्तव नगरपालिकेच्या दारात टाकून अभिनव पद्धतीने तालुक्यातील दिव्यांग बांधव आंदोलन करतील असे शेवटी बाळासाहेब आढाव यांनी म्हटले आहे.