रेल्वे भुयारी रस्त्यातील पावसाचे पाणी काढा नाहीतर गेट उघडा रेल्वेस्टेशन मास्तरांना पत्र

रेल्वे भुयारी रस्त्यातील पावसाचे पाणी काढा नाहीतर गेट उघडा रेल्वेस्टेशन मास्तरांना पत्र

   वृत्तवेध ऑनलाईन| 28Oct2020 By:Rajendra Salkar,18:45

कोपरगांव – कोपरगांव विधानसभा मतदारसंघातील आर.यु.बी. (रेल्वे भुयारी रस्ता) चौकी नं. ६८ व ६९ मध्ये पावसाचे पाणी साचल्याने दळणवळण पुर्णपणे बंद पडल्याने साचलेल्या पाणी काढुन रस्ता पुर्ववत सुरु करुन देणे किंवा पर्यायी व्यवस्था म्हणुन चौकीवरील गेट चालु करण्यात यावे यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव माजी आमदार सौ. स्नेहलता  कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अंचलगांव, ओगदी, बोलकी ,खिर्डी गणेश, करंजी, शिंगणापुर या परिसरातील ग्रामस्थांनी शिंगणापुरचे नवीन नियुक्त स्टेशन मास्तर भैरवनाथ केशवाणी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोना महामारीचे संकट आणि नैसर्गिक आपत्तीने हवालदिल झालेला बळीराजा सातत्याने आर्थीक चटके सहन करत आहे, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध गावांमध्ये मोठया प्रमाणात नुकसान झाले. वादळी पावसाची तीव्रता प्रचंड असल्याने नागरीकांची घरे पडली, काही घरांची पत्रे उडाली. अनेक नागरीक बेघर झाली. या झालेल्या पावसामुळे मनमाड दौंड रेल्वे मार्गावर कोपरगांव रेल्वे स्टेशनपासुन २ कि.मी. अंतरावर असलेली चांदरवस्ती जवळील चैकी नं ६८ व कोपरगांव रेल्वे स्टेशन पासुन ३ कि.मी. अंतरावर असलेले गायकवाड वस्ती जवळील चौकी नं. ६९ या दोन्ही रेल्वे भुयारी मार्गात पावसाचे पाणी मोठया प्रमाणात साचल्यामुळे परिसरातील नागरिकांना जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने मोठया समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर रस्ता बंद असल्याने शेतक-यांना आपला शेतीतील माल, दुध तसेच आजारी पडलेल्या नागरिकांना औषधोपचारासाठी दवाखान्यात येणे जाणेसाठी, शासकीय कामकाजासाठी शासकीय कार्यालयात जाण्यास अडथळा होत असल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहे. तरी गावक-यांची झालेली गैरसोय दुर करण्यासाठी दोन्ही रेल्वे भुयारी मार्गावरील पाणी काढुन रस्ता मोकळा करुन देणेसाठी किंवा पर्यायी व्यवस्था म्हणुन चौकीवरील गेट पुर्ववत चालु करण्यात यावे अशी मागणी निवदेनाव्दारे केली आहे. यावेळी तालकाध्यक्ष साहेबराव रोहोम, संचालक भास्करनाना भिंगारे, संचालक प्रदीप नवले, नवनाथ आगवण, वाल्मीक भास्कर, चंद्रभान रोहोम, चंद्रकात चांदर, रविंद्र आगवण, वेणुनाथ बोळीज, सुभाष शिंदे, गणेश भिंगारे, रमेश शिंदे, भिमा संवत्सरकर, निलेश वराडे आदि उपस्थित होते.   

Leave a Reply

You cannot copy content of this page