निवारा मित्र मंडळाकडून शिवजयंतीला फवारणी यंत्राचे लोकार्पण   

निवारा मित्र मंडळाकडून शिवजयंतीला फवारणी यंत्राचे लोकार्पण

Dedication of spray machine to Shiv Jayanti by Nivara Mitra Mandal

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 19Feb 2021, 17:30

कोपरगाव: सामाजिक उपक्रमांतर्गत नवरात्र उत्सवातील वाचलेल्या खर्चाचा  सदुपयोग करून एक लाख रुपये खर्चाचे फवारणी मशीन खरेदी करून येथील साई निवारा मित्र मंडळ यांचे वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने औषध फवारणी मशीन निवारा, सुभद्रानगर, जानकी विश्व, रिद्धी-सिद्धी नगर, येवला रोड, आढाव वस्ती, साई-सिटी, सह्याद्री कॉलनी, द्वारका-नगरी, शंकरनगर, ओमनगर आदि परिसरातील नागरिकांसाठी राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष , निवारा हौसिंग सोसायटीचे संस्थापक  काका कोयटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

प्रारंभी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सौ सुहासिनी  कोयटे  उपनगराध्यक्ष  स्वप्निल निखाडे अमृत संजीवनी चे अध्यक्ष  पराग संधान शिवसेना गटनेते योगेश बागुल माजी नगरसेवक बबलू वाणी विनोद राक्षे नगरसेवक संजय पवार वैभव गिरमे सामाजिक कार्यकर्ते अकबर भाई शेख निसर भाई शेख  लक्ष्मीनारायण भट्टड निवारा सोसायटीचे माजी अध्यक्ष सुरेंद्र व्यास अमोल  महापुरे प्रमोद नरोडे विष्णुपंत गायकवाड तुषार आहेर अमोल राजूरकर प्रताप जोशी गौरव अग्रवाल संजय पोटे राजेंद्र पाटणकर ज्ञानदेव ससाने पोपट  वीर विजय बोथरा जगन्नाथ बैरागी व नंदिनी कदम विमल कर्डक आदींसह सर्व स्थानिक नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी स्वागत करून उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page