अवकाळी पाऊस तडाखा ; गहू, ज्वारीसह आंब्याचा माेहराचे नुकसान करणार
Unseasonal rain; Wheat, mango along with sorghum will damage the mahera
गुरुवारी सायंकाळपासून कोपरगाव तालुक्यात सर्वत्रच ढगाळ हवामान झाले हाेते.Cloudy weather had prevailed in Kopargaon taluka since Thursday evening.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 18Feb 2021, 20:30
कोपरगाव : कोपरगाव शहरासह तालुक्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे गहू, ज्वारीसह आंब्याचा माेहराचे नुकसान झाले आहे. आज गुरुवारी १८ रोजी सायंकाळपासुन तालुक्यात सर्वत्रच ढगाळ हवामान झाले हाेते.
ठिकठिकाणी अवकाळी रिमझिम पाऊस पडू लागल्यामुळे शेतकरी बाधंवाची धांदल सुरु झाली आहे. काढणीस आलेल्या गव्हाच्या व ज्वारीच्या उभ्या पिकांचे या अवकाळी पावसाने नुकसान होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गुरुवार आणि शुक्रवारी मध्यम व मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता . हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा, आणि पाऊस बरसला, सद्यःस्थितीत, एकीकडे वीज वितरण कंपनीने वीज बिलाची वसुली करण्यासाठी रोहित्र बंद करण्यास सुरुवात केली आहे. शेतात पिके उभी असून रोहित्र बंद केल्यामुळे पिकांना पाणी भरण्यासाठी वीज आवश्यक असल्याने शेतकरी एकत्र येऊन वीज बिलाची काही प्रमाणात रक्कम भरून रोहित्र सुरू करण्यासाठी धावपळ करीत आहेत. त्यातच ढगाळ वातावरण होत असल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसामुळे वाया जातील या भीतीमुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. काही ठिकाणी हरभरा, ज्वारीची पिके काढून ठेवली आहेत. ती या अवकाळीत सापडू नयेत यासाठी मळून धान्य घरी आणण्याची शेतकऱ्यांची गडबड सुरू झाली आहे. परिणामी वेगवेगळ्या संकटातून सावरताना शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.





