शिवाजी महाराजांबरोबर त्यांना घडविणारी जिजाऊ सुद्धा निर्माण झाली पाहिजे – दौलतराव जाधव

शिवाजी महाराजांबरोबर त्यांना घडविणारी जिजाऊ सुद्धा निर्माण झाली पाहिजे – दौलतराव जाधव

Along with Shivaji Maharaj, Jijau should also be formed to make them – Daulatrao Jadhav

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 22Feb 2021, 16:30

कोपरगाव : शिवाजी महाराजांबरोबर त्यांना घडविणारी जिजाऊ सुद्धा निर्माण झाली पाहिजे – दौलतराव जाधव संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये शिवजंयती उत्साहात साजरी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्या विचारावर चालण्याची गरज आहे. त्यासाठी शिवाजी महाराजांबरोबर त्यांना घडविणारी जिजाऊ सुद्धा निर्माण झाली पाहिजे, असे विचार कोपरगाव  ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल येथील शिवजयंती उत्सव प्रसंगी व्यक्त केले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत, पोवाडे, भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य नाटक असे विविध कार्यक्रमांनी संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुल मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  शिवरायांना अभिवादन करून पोवाडाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुलचे मॕनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुका विवेक कोल्हे, स्कुलचे अकडमीक हेड हरीभाऊ नळे, प्राचार्य बाळासाहेब जाधव यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या संकटात पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांना मानवंदना दिली. विद्यार्थी गौरव आभाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज तर कावेरी आढाव हिने माँसाहेब जिजाऊ, यांची वेशभूषा केली यावेळी इतर विद्यार्थी देखील बालमावळे यांच्या वेशभूषेत उपस्थितीत होते.   संस्थेचे संस्थापक माजी मंत्री शंकरराव कोल्हे , विश्वस्त बिपीनदादा कोल्हे, विश्वस्त माजी आ. सौ. स्नेहलता कोल्हे, जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी उपक्रमाची प्रशांसा करुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.  प्रास्तविक व परिचय विद्यार्थीनी आर्या देशमुख तर सुत्रसंचालन हिमांशु बाविस्कर, उत्सवी देवकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार शिवानी वल्टे मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page