निराधारांच्या खात्यावर थेट १ काेटी २० लाख

निराधारांच्या खात्यावर थेट १ काेटी २० लाख

1 crore 20 lakhs directly on the account of the destitute

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 23Feb 2021, 16:30

कोपरगाव : तालुक्यात निराधारांची संख्या मोठी आहे. अपत्य नसलेले, वारसदारांनी त्याग केलेले, आधारहीनतेच्या चक्रात अडकलेल्या निराधारांना दिलासा देण्यासाठी संजय गांधी निराधार, श्रावणबाळ सेवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी अपंग निवृत्ती वेतन, अशा पाच योजना कार्यान्वित आहेत. अशी माहिती संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार सौ. एम. एस. गोरे मॅडम यांनी दिली.

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ सेवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन,

समाजातील आधारहीन लोकांचा वृद्धापकाळ सुखकर व्हावा, आयुष्याच्या उतारवयात त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, या उद्देशाने तालुक्यातील ५ हजार १९७ विधवा, दिव्यांग, वृद्ध निराधारांच्या खात्यावर तीन महिन्यांचे १ कोटी २० लाख २८ हजार २०० रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्ये दिलासा म्हणून केंद्र सरकारने योजनेतील ७४२ निराधारांना एक हजार रुपयाप्रमाणे ७ लाख ४२ हजार सानुग्रह अनुदानही दिले होते . त्यामुळे सरकारकडून मिळालेले १ कोटी २० लाख २८ हजारांचे २०० रूपये अनुदान तालुक्यातील निराधारांसाठी आधाराची काठी ठरली आहे. त्यात निकषांत बसणाऱ्या लाभार्थींना प्रतिमहिना एक हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.अशी माहिती अव्वल कारकून सौ प्रमिला गोंदके यांनी दिली. तालुक्यात पाचही योजनांच्या लाभार्थींची संख्या ५ हजार १९७ आहे. लॉकडाउनच्या परिस्थितीत अडकलेल्या सर्वसामान्य वर्गाला सरकार आवश्‍यक मदत पोचवीत आहे. त्याच अनुषंगाने सरकारने जातीनिहाय नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यांचे अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार लाभार्थींना अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्यात आली असून तालुक्यातील लाभार्थींच्या खात्यावर थेट एक कोटी २० लाख २८ हजार २०० रुपयाचे अनुदान वर्ग करण्यात आले. तर माहे फेब्रुवारी साठी ४३ लाख ७१ हजार आठशे तर माहे मार्च करता ४४ लाख ७१ हजार ७०० असे एकूण एक कोटी ५ लाख ३७ हजार शंभर रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याकामी सहाय्यक संगणक ऑपरेटर अर्चना जायकर यांनी मदत केली. राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना यामध्ये वय वर्षे ६५ व दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीचा समावेश असल्याने कोपरगाव तालुक्यामध्ये या योजनेत एकही लाभार्थी नाही. विधवा महिलांना एक मुलगा असेल तर दरमहा अकराशे दोन मुले असतील तर बाराशे रुपये अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे दुर्धर आजारात साठी एक हजार रुपये महिना अनुदान देण्यात येते. बँकेतून अनुदान काढण्यासाठी पारदर्शकता राहावी यासाठी थेट बँकेत जाऊन पैसे काढण्याची अट घालण्यात आलेली आहे परंतु अनेकजण एटीएमचा वापर करतात ते चुकीचे आहे.

चौकट

योजनानिहाय लाभार्थी संख्या संजय गांधी निराधार- २४२९ श्रावणबाळ सेवा-२०१४ राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन-७४६ राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन-०८ राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन-० राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य-१३ सरकारकडून प्राप्त झालेले अनुदान लाभार्थींच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. तत्पर सेवेसाठी प्रशासन सतर्क आहे. कोरोनाच्या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या सूचना व आदेशांचे पालन प्रत्येकाने करावे. – सौ. एम. एस. गोरे , नायब तहसीलदार (संजय गांधी निराधार योजना), कोपरगाव

Leave a Reply

You cannot copy content of this page