“काकासाहेब कोयटे सहकार प्रशिक्षण केंद्र” नागपुरात; मंत्री नितीन गडकरी करणार लोकार्पण 

“काकासाहेब कोयटे सहकार प्रशिक्षण केंद्र” नागपुरात; मंत्री नितीन गडकरी करणार लोकार्पण

Minister Nitin Gadkari inaugurates building named after Sahakar Maharshi Kakasaheb Koyte in Nagpur

कोपरगाव : सहकार व पतसंस्था चळवळीच्या क्षेत्रात  आदराने उल्लेख केल्या जाणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे काकासाहेब कोयटे अशा बहुप्रतिभावंत व्यक्तीमत्त्वाच्या नावाने  नंदनवन नागपूर येथे “काकासाहेब कोयटे सहकार प्रशिक्षण केंद्र” या नावाने एका ईमारतीचे  लोकार्पण केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते रविवारी (२७जुन) रोजी दुपारी १२ वाजता ऑनलाईन होत आहे अशी माहिती नगरसेवक जनार्दन कदम यांनी दिली.

कोपरगाव  तालुक्यातून आपल्या जिवनाची सुरूवात करणारे काका कोयटे यांचे संपूर्ण आयुष्य सहकारातून अनेकांना रोजगार, व्यवसायाकरिता प्रेरित करण्यात जात आहे. काकासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सहकारी पतसंस्थेची आर्थिक उलाढाल १००० कोटीची आहे. सहकार क्षेत्रात लाखो व्यक्तींना प्रशिक्षित करून रोजगाराची दिशा दाखवली. काकासाहेब आज महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. राजकारणात त्यांचा आदरयुक्त, सन्मानाने स्वागत होते.. काकासाहेब कोयटे लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे मुख्य समन्वयक सुध्दा आहेत.परंतु सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर सोहळा आँनलाईन ऐवजी प्रत्यक्ष होण्याची शक्यता आहे. काका  कोयटे यांचे मुळे कोपरगाव चे नाव निश्चितच उंचावले गेले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page