वीस लाख खर्चाच्या कुंभारी व नाटेगांव सामाजिक सभागृहांचे लोकार्पण

वीस लाख खर्चाच्या कुंभारी व नाटेगांव सामाजिक सभागृहांचे लोकार्पण

Dedication of Kumbhari and Nategaon social halls at a cost of Rs. 20 lakhs

लोकार्पण सोहळा

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 24June :16:50

 कोेपरगांव: शहर आणि विधानसभा मतदार संघाचा पायाभूत विकासात्मक आराखडा तयार करून तो तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते, नगर, ग्रामविकास व अन्य विभागाकडे सादर करून अत्यंत छोटया छोटया गोष्टीचा त्यात अंर्तभाव केल्यांने आगामी दहा वर्षापर्यंत त्याच्या विकासासाठी निधी मिळत राहिल अशी व्यवस्था करून ठेवल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

तालुक्यातील कुंभारी व नाटेगांव येथे सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या स्थानिक विकास निधीतुन २० लाख रूपये खर्चाची सामाजिक सभागृहे उभारण्यांत आली त्याचे लोकार्पण सोमवारी करण्यांत आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सत्ता असो अगर नसो पण कोपरगांव विधानसभा मतदार संघाचा प्रामाणिकपणे विकास करून येथील सर्वच घटकांना बरोबर घेवुन प्रगती साधायची ही शिकवण पक्षासह माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी दिली असेही त्या म्हणांल्या.                    प्रारंभी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी माजी आमदार कोल्हे यांनी गत पाच वर्षात केलेल्या विकासाची माहिती देत भविष्यतील संकल्पना स्पष्ट केल्या. राघवेश्वर महाराज यांनी स्वागत  केले. याप्रसंगी कुंभारीच्या राघवेश्वर देवस्थान येथे गोदाकाठी गंगादशहरा पुजन, वृक्षारोपण तर नाटेगांव येथे शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यांत आले.  नाटेगांवचे सरपंच विकास मोरे यांनी तत्कालीन शासन व आधारस्तंभ बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार कोल्हे, जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे विकासासाठी मिळालेल्या निधीची माहिती दिली. याप्रसंगी कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक सोपानराव पानगव्हाणे, शिवाजीराव कदम, राजेंद्र कोळपे, विजय कदम, दिपक चैधरी, सुनिल कदम, कुंभारी, नाटेगांव पंचक्रोशीतील ज्येश्ठ कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी डाॅ. गोरक्षनाथ मोरे यांनी आभार मानले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page