कोपरगावची सुनबाई बनली गोंदियाची जिल्हाधिकारी

कोपरगावची सुनबाई बनली गोंदियाची जिल्हाधिकारी

Sunbai of Kopargaon became the Collector of Gondia

कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा Kopargaon’s crown of honor

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Wed 14July 18:00

कोपरगाव : कोपरगावची सुनबाई असलेल्या नयना अर्जुन गुंडे यांनी मंगळवारी गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीने कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नयना गुंडे या मूळच्या सोलापूरच्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण गावचे सुपुत्र डॉ. अर्जुन गुंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. डॉ. अर्जुन गुंडे हे सध्या सोलापूर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. १९९२ साली नयना गुंडे यांनी प्रशासकीय सेवेत पदार्पण केले. त्यांनी यापूर्वी कुर्डुवाडी व सोलापूर येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर नाशिक विभागात म्हाडाच्या मुख्याधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. नाशिक विभागातच उपमहानिरीक्षक नोंदणी विभागाचे कामकाजही त्यांनी पाहिले. २०१४ साली त्यांचे आयएएस म्हणून प्रमोशन झाले. प्रमोशन झाल्यानंतर नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर पुणे परिवहन महामंडळात चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून, यशदा ट्रेनिंग प्रबोधनी येथे उपमहासंचालक म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे. प्रत्येक पदावर काम करीत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून त्यांनी काम केले. त्यांच्या चांगल्या कामाची पोचपावती देत शासनाने त्यांची गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे.

त्यांच्या या नियुक्तीने कोपरगाव तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण गाव. घरची परिस्थिती बेताचीच. अशा परिस्थितीत डॉ. अर्जुन गुंडे प्रशासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत असून आज ते सोलापूर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. घरातील कुणी तरी जिल्हाधिकारी व्हावे असे स्वप्न कैलासवासी तुळशीराम कारभारी पाटील गुंडे यांनी पाहिले होते आज त्यांच्या सुनबाई असलेल्या नयना अर्जुन गुंडे यांनी मंगळवारी गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.आणि त्यांनी आपले सासरे कै. तुळशीराम कारभारी पाटील गुंडे यांचे स्वप्न पूर्ण केले, गोंदिया जिल्हाधिकारी सौ. नयना अर्जुन गुंडे यांनी कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला याबद्दल त्यांच्या या यशाबद्दल माजी मंत्री शंकरराव कोल्हे माजी आमदार अशोकदादा  काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष  काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे नितीन दादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, ठोळे उद्योग समूहाचे कैलासशेठ ठोळे कोपरगाव औद्योगिक वसाहत चेअरमन विवेक कोल्हे आदींनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या,

Leave a Reply

You cannot copy content of this page