के.बी.रोहमारे कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद
Record of two students of KB Rohmare College in the World Book of Records
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Wed 14July 18:30
कोपरगाव : तामिळनाडू येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम संस्थेच्या वतीने फेम टू सॅटॅलाइट उपग्रह तयार करण्यासाठी भारतातील एक हजार विद्यार्थ्यांमध्ये आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील कु. सिद्धी अतुल बोधे व समाधान लोहकरे या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. यादव यांनी दिली.
या उपक्रमात दहा-दहा विद्यार्थ्यांच्या १०० ग्रुपने १०० फेम टू सॅटॅलाइट बनवले व १०० सॅटॅलाइट एकाच वेळी प्रक्षेपित करण्याचा जागतिक विक्रम केला. या विक्रमाची जगातील विविध संस्थानी दखल घेतली असून या विद्यार्थ्यांना या उपक्रमातील सहभागाबद्दल असिस्ट वर्ड रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच स्पेस ऑफ इंडिया अशा विविध नामांकित संस्थांनी प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल अध्यक्ष अशोक रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, संदीपदादा रोहमारे, सुजितदादा रोहमारे यांनी सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक उपप्राचार्य सोनवणे बी. आर. यांनी केले. माजी उपप्राचार्य श्री. बारे एन. जी., कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे, डॉ. के. एल. गिरमकर उपस्थित होते. सूत्रसंचालन बुधवंत डी. एस. यांनी व आभार सूर्यवंशी ए. एफ. यांनी व्यक्त केले.





