दुर्लक्षित झालेल्या सर्वच रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावू  – आ.आशुतोष काळे

दुर्लक्षित झालेल्या सर्वच रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावू  – आ.आशुतोष काळे

Let’s solve the problem of all the neglected roads – MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 29July 21:40

फोटो ओळ- वडगाव येथे विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करतांना आ. आशुतोष काळे व उपस्थित मान्यवर.

कोपरगाव : तालुक्यात रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढतांना आजवर जे रस्ते दुर्लक्षित राहिले अशा दुर्लक्षित झालेल्या सर्वच रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. कोपरगाव तालुक्यातील वडगाव येथे एका कार्यक्रमात बोलत होते.  अध्यक्षस्थानी ॲड .मारुतराव कांगणे होते.

कोपरगाव तालुक्यातील वडगाव येथे २५१५ मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत ४८ लक्ष रुपये निधीतून बस स्टँड ते पांडुरंग कांगणे वस्ती रस्ता, खंडेराव सोनवणे वस्ती ते सोमनाथ कांगणे वस्ती रस्ता, भीमराज केदार शेती ते गणपत सोनवणे वस्ती रस्ता व शिवाजी सोनवणे शेती ते पांडुरंग केदार वस्ती रस्ता या रस्त्यांच्या डांबरीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन आशुतोष  काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोपरगाव तालुक्यातील अनेक रस्त्यांनी मागील पाच वर्षात डांबर पहिले नाही त्यामुळे रस्ते विकासाचा मोठा अनुशेष आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध माध्यमातून रस्त्यांसाठी निधी मिळवीत आहे.मतदार संघाला न्याय देतांना सर्वच रस्त्यांचा विकास करण्याचा माझा मानस आहे. मात्र रस्त्यांचे काम गुणवत्तापूर्ण होऊन हे रस्ते दीर्घकाळासाठी नागरिकांच्या उपयोगात आले पाहिजे. त्यासाठी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हे रस्ते पाईपलाईनसाठी खोदले जाणार नाही याची काळजी घेऊन रस्त्याचे काम सुरु होण्यापूर्वीच पाईपलाईनचे काम पूर्ण करावे जेणेकरून रस्त्याला नुकसान पोहचणार नाही. पश्चिम भागातील अतिशय महत्वाच्या असणाऱ्या राज्यमार्ग ७ ची दुरावस्था झाल्यामुळे त्याचा परिणाम या राज्यमार्गा लगत असणाऱ्या व्यवसायांवर झाला आहे व परिसरातील नागरिकांना देखील त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.   या राज्यमार्गाच्या लगत असणाऱ्या गावातील नागरिकांनी या रस्त्याच्या नूतनीकरण व्हावे अशी मागणी केली होती. त्याबाबत पाठपुरावा करून या राज्यमार्ग ७ साठी निधी उपलब्ध झालेला आहे. लवकरच या राज्यमार्गाचे काम सुरु होऊन नागरिकांना येत असलेल्या अडचणी कमी होणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.  याप्रसंगी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, जिल्हा परिषद  सदस्य सुधाकर दंडवते, केएसके कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सचिन चांदगुडे, अशोक तिरसे, मीननाथ बारगळ, पं. स. सदस्य अनिल कदम, सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता आर.बी. चौधरी, सरपंच सौ. मनीषा कांगणे, उपसरपंच भीमराज केदार,  सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. .          

Leave a Reply

You cannot copy content of this page