एक लाख ६१ हजार रुपयांना विकली गेली गाय

एक लाख ६१ हजार रुपयांना विकली गेली गाय

The cow was sold for one lakh 61 thousand rupees

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fri 30July 15:00

कोपरगाव : तालुक्यातील कुंभारी या गावी एक गाय तब्बल १ लाख ६१ हजार रुपयांना विकली गेली आहे. ही गाय एच. एफ. होस्टेन या जातीची असल्याचे सांगण्यात आले. कुंभारी येथील शेतकरी अरूण रघुनाथ कदम यांचा शेती सोबत पशू पालनाचा जोडव्यवसाय आहे.

कदम यांच्याकडे असलेली दुसऱ्या विताची पाच वर्ष वयाची ही गाय निर्मळ पिप्रिं येथिल व्यापारी सिंकदर पठाण यांनी तब्बल १ लाख ६१ हजार रुपये मोजून खरेदी केली. गायीला एवढी किंमत आल्याने गाव परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.या गायीला एवढी किंमत मिळाल्याचे कारणेही अनेक आहेत. या जाती विषयी माहिती देताना कदम यांनी सांगितले की, या जातीमध्ये प्रतिकार शक्ती अधिक असते. त्यांची शारीरिक वाढ चांगली होते. गायीची शरीरयष्टी रंग उंची कासेचा भरना बघुन जो तो कदम यांची स्तुती करत होता मागील विता मध्ये २७ लिटर तर या वेळेला ३० लिटर च्या पुढे गाय दुध देईल गोठ्यात सर्व एच. एफ. होस्टेन जातीच्या गायी असुन खाद्य चारा पोषक घटकांचा समावेश वेळोवेळी खाद्यमध्ये केलेला असतो एक हेक्टर क्षेत्रावर केवळ चारा पिकांची लागवड केलीली असल्याने मेहनतीच्या जोरावर त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते.असे कदम यांनी सांगितले.

कोळपेवाडी येथील मध्यस्थी राजेंद्र महाजन व्यापारी पठाण व कदम यांचा गावकऱ्यांनी फेटा बांधुन सत्कार केला . वाजत्रींच्या ठेक्यावर गुलाल उधळत गायीची निघालेली वरात …व पाठवनी करतांना वाजत्रीं च्या मुखातून.. बाबुल …कि दुवाये लेती जा ! ससुराल मे तुझको प्यार मिले ..तेंव्हा गायीची मालकिन सुवर्णा यांनी गळ्यात पडत अश्रू नयनांनी दिलेला निरोप बघतांना गाय बघण्यासाठी आलेले गावकरीही भावुक झाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page