त्यांचा आरोप , हा तर आमच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला पुष्टी देणारा -दत्ता काले
His allegation confirms our allegation of corruption – Datta Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fri 30July 18:10
कोपरगाव : २८ विकास कामापैकी ८७ लाखाच्या गटारीमध्ये पंचवीस ते तीस लाखाचा मलिदा मिळणार होता तो मिळाला नाही म्हणूनच शिवसेना नगरसेवकांनी पालिकेत जाऊन वाद विवाद केला असल्याचा आरोप एका कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे यांच्यासमोर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केला.त्यांचा हाच आरोप आमच्या विकास कामातील भ्रष्टाचाराच्या आरोपाला पुष्टी देणारी असल्याचा दावा भाजप शहराध्यक्ष दत्ता काले यांनी एकापत्रकाव्दारे केला आहे. गंगूले यांच्या याच खुलेपणा बद्दल काले यांनी त्यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.
कोपरगाव शहर विकासाच्या नावाखाली ठेवण्यात ठेवण्यात आलेल्या २८ कामांमध्ये भ्रष्टाचाराचा वास येत असल्याने दोन वेळा आम्ही सभागृहात २८ कामे री इस्टिमेट करून पुन्हा सभागृहाकडे ठेवावी म्हणून नामंजूर केली, जिल्हाधिकारी यांनाही या कामात भ्रष्टाचार असल्याचे लेखी कळवल, परंतु पालिकेने कलम ३०८ अन्वये दावा दाखल करून सदर सदर कामांची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. री इस्टिमेट करून सदर कामे करावयाची असल्यास नगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देऊन आमच्या नामंजुरीला जिल्हाधिकारी यांच्याकडून स्थगिती मिळवून पुन्हा त्याच कामांचा घाट घातला जात असल्याचे पाहून जनतेचा पैसा वाचविण्यासाठी आम्हाला या कामांना न्यायालयातून स्थगिती मिळवावी लागली होती, मात्र त्याचे सत्ताधारी व विरोधक यांनी राजकीय भांडवल करून बहुमताच्या बळावर आम्ही शहर विकासकामात खोडा घालत असल्याचा आकांडतांडव केला यावरून आरोप-प्रत्यारोपाचे रणकंदन न ही झाले. गटारी च्या एकाच कामात तीस लाखाचा मलिदा मिळणार होता तर मग साडेआठ कोटीच्या २८ कामांमध्ये कितीचा मलिदा मिळणार होता ? याचे उत्तर आता गंगुले यांनीच द्यावे,त्यांचा आकांडतांडव पाहता यात नगराध्यक्षांपेक्षा जादा मलिदा काळे गटाच्या नगरसेवकांना मिळणार होता की काय ? अशी शंका आता यात येवु लागली आहे असा टोलाही काले यांनी शेवटी लगावला आहे.
Post Views:
331