संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या मदतीने भारावले खेर्डीकर
Bharawale Kherdikar with the help of Sanjeevani Yuva Pratishthan
भर पावसात पुरग्रस्तांना मदत साहित्याचे वाटप केले,Distributed relief materials to flood victims
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 3 August 16:10
कोेपरगांव: चिपळूण तालुक्यातील खेर्डी गावात भर पावसात चिखल तुडवित पूरग्रस्तांच्या घरोघरी जाऊन विविध खाद्यपदार्थ, अंथरूण पांघरूण, पुरूष महिला भगिनींसाठी कपडे, लहान मुलांना स्वेटर, टी शर्ट स्वच्छ, पिण्याचे पाणी असे दोन ट्रक मदतसाहित्य विवेक कोल्हे यांच्यासह संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ५० युवा सेवकांनी वाटप करुन आधार दिला . तर याभागात साथीचे आजार पसरू नये यासाठी विवेक कोल्हे सह सर्व सेवकांनी श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवत फाॅगींगच्या माध्यमांतुन कीटकनाशक फवारणी देखील केली. संजीवनी युवा प्रतिष्ठान च्या मदतीने आवघ्ये खेर्डी गाव भारावले.
अनेकांच्या डोळयात तरळणांरे अश्रु दिसत होते. या भागात पुराचा तडाखा मोठा होता, अनेक रहिवासीयांच्या घरात पाणी घुसल्यांने अबाल वृध्दांचे हाल झाले. त्यांना वैद्यकिय सेवाही मिळणे दुरापास्त होते त्यासाठी सोबत नेलेल्या वैद्यकिय पथकाद्वारे सेवा दिली. मदत नव्हे सेवाकार्य या भावनेतुन काम करतांना संजीवनी युवासेवकांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. चिखलाची दलदल, सतत सुरू असलेला पाउस, शेकडो किलोमिटर दुर जाउन केलेले कार्य खेर्डी चिपळूणवासियांनी या मदतीबददल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी भाजपाचे कोकण विभाग संपर्क प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांनी समक्ष संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या मदतकार्यची समक्ष पाहणी केली. घरोघर मदतकार्य वाटप होत असल्यांने विवेक कोल्हे व त्यांच्या संपुर्ण मदत पथकाचे कौतुक केले. या संकट काळात प्रत्यक्ष घटनास्थळी येत धीर दिल्यांने सर्वत्र संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगांववासियांच्या मदत कार्याची चर्चा करत सरपंच सौ वृंदा दाते, उपसरपंच विजय शिर्के, विजय दाते, ग्रामपंचायत सदस्य विनोद भूरण त्यांचे सर्व सहकारी, ग्रामविस्तार अधिकारी अनिल शिंदे, खेर्डी ग्रामस्थ आदिंनी आभार मानले. या सेवाकार्यात उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, रवि रोहमारे, नाटेगांवचे सरपंच विकास मोरे, वारीचे उपसरपंच विशाल गोर्डे, युवासेवक सिध्दार्थ साठे, रोहित कणगरे यांच्यासह ५० युवासेवक उपस्थित होते.