वाढदिवस नको, पुरग्रस्तांना मदत करा – आ.आशुतोष काळे

वाढदिवस नको, पुरग्रस्तांना मदत करा – आ.आशुतोष काळे

No birthday, help the flood victims – MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 3 August 17:00

कोपरगाव :  राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होवून अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे या कुटुंबाप्रती सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी सर्व खर्चाला फाटा देऊन पूरग्रस्तांना मदत करावी असे  आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे

४ ऑगस्ट रोजी आपल्या  वाढदिवसानिमित   विवीध सामाजिक उपक्रम राबविले जातात व ह्जारो कार्यकर्ते पुष्पगुच्छ घेवून  शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. मात्र राज्यातील काही जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांना त्याचा फटका बसून त्या कुटुंबांची अपरिमित हानी झाली आहे. कोरोनाचे संकट अजून मिटलेले नाही. परिस्थिती नियंत्रणात असली तरी पूरपरिस्थितीमुळे आपल्या बांधवांवर आलेल्या संकट काळात वाढदिवस साजरा करणे उचित नाही. तसेच माझ्या वाढदिवसानिमित्त मी बाहेरगावी असल्यामुळे आपल्या शुभेच्छा देखील स्वीकारू शकणार नाही.असे त्यांनी स्पष्ट केले.  आपण आजपर्यंत काळे परिवारावर केलेल्या प्रेमामुळे मला नेहमीच सामाजिक काम करतांना प्रेरणा मिळत आहे.

आपले शुभेच्छारुपी आशीर्वाद यापुढेही असेच माझ्या पाठीवर ठेवून माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा  फ्लेक्स न लावता व पुष्प गुच्छावर होणारा खर्च टाळून  ह्या खर्चाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देवून सामजिक दायित्व पार पाडावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page