कोपरगाव येथे समता ट्रस्ट व लायन्स चे वतीने रक्तदान शिबीर

कोपरगाव येथे समता ट्रस्ट व लायन्स चे वतीने रक्तदान शिबीर

Blood donation camp on behalf of Samata Trust and Lions at Kopargaon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir24sep 2021, 18:20Pm.

कोपरगाव : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून यातून रक्तदाते सामाजिक दायित्वाची भूमिका पार पडत असतात. स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात समता चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने काका कोयटे  वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

     शिबिराचे उद्घाटन शिर्डी येथील श्री साईनाथ हॉस्पिटलच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुप्रिया सुंभ, समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे व लायन्सचे रामदास थोरे यांचे हस्ते  दीपप्रज्वलन करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे राजेश ठोळे यांनी मनोगत व्यक्त करून रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे आभार मानले.         

  प्रसंगी महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, महासचिव डॉ.शांतीलाल शिंगी, खजिनदार दादाराव तुपकर, संचालिका सौ.अंजलीताई पाटील व मुख्यकार्यकारी अधिकारी  सौ.सुरेखा लवांडे आदींनी सदिच्छा भेट दिली. विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संघटना व सहकारी संस्थांच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या सत्कार करण्यात आला. समता पतसंस्थेचे संचालक निरव रावलिया यांनी ७५ वेळा रक्तदान केले त्यामुळे एक सामाजिक दायित्वाच्या बाबतीत एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

तसेच टेक्निशियन सविता मानकर,शिवाजी आवळेकर,चंद्रकांत लुटे, विजया निर्मळ, सुनिता वाघमारे, श्री.अमोल देवकर, सचिन साप्ते,दीपक डांगे, अप्पा कुमावत, आदींनी रक्त संकलनासाठी मोलाचे सहकार्य केले. शिबीर यशस्वितेसाठी समता चॅरिटेबल ट्रस्ट, समता पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे पदाधिकारी पदाधिकारी, कोपरगाव व राहाता येथील लिंगायत संघर्ष समितीचे प्रदीप साखरे, शिवकुमार सोनेकर, शाम जंगम, अमोल राजूरकर व पदाधिकारी आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार कोपरगाव लिंगायत संघर्ष समितीचे श्री प्रदीप साखरे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page