वहाडणें यांच्याशी झालेल्या समझोतानंतर भाजप-सेनेची खंडपीठातून माघार- पराग संधान

वहाडणें यांच्याशी झालेल्या समझोतानंतर भाजप-सेनेची खंडपीठातून माघार- पराग संधान

After the agreement reached with Vahadane, BJP-Sena withdrew from the bench

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir24sep 2021, 18:30Pm.

 कोपरगाव : त्या २८ कामाबाबत औरंगाबाद खंडपिठात दाखल करण्यांत आलेली याचिका क्रमांक ६८९६/२०२१ बाबत नगराध्यक्ष विजय वहाडणे व उभयतामध्ये चर्चेअंती तडजोड होवुन ही सर्व कामे दर्जेदार होण्याबाबत समझोता झाल्याने शुक्रवारी (२४) रोजी याचिका मागे घेण्यांत आल्याची माहिती अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान यांनी दिली.

शहर विकासासाठी नगरपालिकेत भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली भाजपा सेना, आरपीआय, गटनेत्यांसह नगरसेवकांचा विकास कामांना सतत पाठींबा दिला आहे. मात्र बहुचर्चित शहर विकासाच्या २८ कामांपैकी २२ कामांनाबाबत आमचा आक्षेप नव्हता, तर त्यातील उर्वरित अतिरिक्त इस्टिमेट असलेल्या सहा कामांना आमची हरकत होती. निदर्शनास आणून व वारंवार सांगूनही यात बदल होत नव्हता याउलट काही लोकांनी आम्हाला बदनाम करण्यासाठी त्याचे राजकीय भांडवल केले. त्यामुळे हा प्रश्न चिघळला गेला, नाईलाज झाल्याने आम्ही जनतेचा पैसा वाचविण्यासाठी याविरोधात खंडपीठात धाव घेतली होती. मात्र नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शहर विकासाच्या आव्हानाला साथ देत त्यांच्या बरोबर त्या सहा आक्षेपार्ह कामाबाबत झालेल्या चर्चेतील समझोतानंतर आज शुक्रवारी (२४) रोजी खंडपीठातून माघार घेत असल्याचे पराग संधान यांनी स्पष्ट केले . ही सर्व विकासकामे तात्काळ व दर्जेदार होण्यांसाठी आम्ही सर्वजण जाणिवपुर्वक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले .

Leave a Reply

You cannot copy content of this page