“साठवणीतील आठवणी” पुस्तक काका कोयटे यांनी पतसंस्थासाठी केलेल्या कामाचा पुरावा – शरद पवार
Book “Memories in stock” Evidence of work done by Kaka Koyte for Patsanstha – Sharad Pawar
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 3 Oct 2021,17:50Pm.
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपद भूषवित असताना काका कोयटे यांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली असून साठवणीतील आठवणी हे पुस्तक त्यांनी पतसंस्थांसाठी केलेल्या कामाचा पुरावा असल्याचे गौरवोद्गार खा. शरद पवार यांनी त्यांच्या हस्ते करण्यात आलेल्या ‘साठवणीतील आठवणी’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात काढले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने ए. आर. ऑफीस पासून ते मंत्रालयापर्यंत, बंद पडलेल्या बँकेपासून ते रिझर्व्ह बँकेपर्यंत आंदोलने आणि मोर्चे तसेच सामान्य पतसंस्थांपासून ते केंद्रीय अर्थमंत्र्यांपर्यंत आणि ग्रामीण भागातील पतसंस्थांपासून ते परदेशातील पतसंस्थांपर्यंतच्या भेटी घेऊन पतसंस्था चळवळीतील विविध प्रश्न, समस्यांची सोडवणूक,२०१६ मध्ये आरबीआयवर काढलेले मोर्चे , आंदोलनाने पतसंस्थांचे विविध प्रश्न सोडविले,पतसंस्था चळवळ अधिक बळकट केली. सर्व प्रवासाची माहिती ‘साठवणीतील आठवणी’ या पुस्तकात लिहिलेली आहे. सदर पुस्तकाविषयी शरद पवार यांना राज्य काका कोयटे यांनी माहिती दिली असता पतसंस्थांना येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी दिल्लीला येण्याचे आमंत्रण दिले.
प्रसंगी प्रतापराव पवार,महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे, अहमदनगर जिल्ह्य स्थैर्य निधीचे अध्यक्ष व श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, शांतीलाल सिंगी, सुदर्शन भालेराव, सौ. सुरेखा लवांडे तसेच राज्य फेडरेशनचे पदाधिकारी, पतसंस्था चळवळीतील पदाधिकारी उपस्थित होते.