कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव १० दिवस लॉकडाऊन

कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव १० दिवस लॉकडाऊन

Godhegaon in Kopargaon taluka 10 days lockdown

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 3 Oct 2021,17:20Pm.

कोपरगाव : तालुक्यातील गोधेगावत अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना दुकाने रविवारी रात्री १२ वाजेपासून १० दिवस बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी रविवारी दिले आहेत.अशी माहिती पंचायत समिती गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्याचा दररोज कोविड रुग्ण पॉझेटिव्हीटी दर ५ % च्यावर जावून पोहचला आहे. त्यामुळे १० पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण रुग्णसंख्या असलेल्या गावांमध्ये कंटेनमेंट झोन असनूही प्रभावी पणे अंमंलबजावणी होत नसल्याने, जिल्ह्यातील ६१ गावामंध्ये कोपरगाव तालुक्यातील गोधेगावचा समावेश असल्याने रविवारी रात्री १२ वाजेपासून अर्थात ४ ऑक्टोबर पासून १३ ऑक्टोबर पर्यंत सलग १० दिवस सेवा दवाखाने, मेडीकल, टेस्टिंग सेंटर वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याबाबत आदेश जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी जारी केले आहेत. तसेच या परिसरा ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहिल. तसेच सदर क्षेत्रातील नागरीकांचे व वाहनांचे अवागमन प्रतिबंधित करण्यात आले आहे मात्र यातून शेतीमाल व आवश्यक वस्तू वाहतूक वगळण्यात आली आहे. असेही आदेशात म्हटले आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page