जनार्दन स्वामींचा वारसा रमेशगिरी पुढे चालवत आहे -विवेक कोल्हे
Rameshgiri is carrying on the legacy of Janardhan Swami – Vivek Kolhe
कोपरगांव : राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी अध्यात्माची सांगड श्रमदानाबरोबर घालुन त्यातुन धार्मीकता जोपासण्याचे मोठे काम केले त्यांचाच वारसा शिष्य. प. पू. रमेशगिरी महाराज हे पुढे चालवत असल्याचे प्रतिपादन कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी प.पू रमेशगिरी महाराज यांचा ६७ व्या अभिष्टचिंतन सोहळाप्रसंगी केले.
सोमवारी जनार्दन स्वामी समाधी मंदिर स्थळावर कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी फाउंडेशनचे सुमित कोल्हे यांच्या हस्ते सामुदायिक महाआरती, षोडशोपचार पाद्यपुजा सोमवारी पार पडली .
याप्रसंगी संचालक अरूण येवले, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे उपाध्यक्ष दत्तात्रय होळकर, विश्वस्थ अनिल जाधव, विलास कोते, कामगार नेते मनोहर शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, दत्तगिरी महाराज (वैजापुर), राघवेश्वर महाराज (कुंभारी), गुलाबगिरी महाराज (दहेगांव), हभप खरात महाराज (वावी), संदिपगिरी महाराज (येवला), सोपान विखे, चांगदेवराव कातकडे, दिपक कोटमे, साईनाथ खिरडकर, विष्णुपंत कोल्हे, संदिप शिंदे, डॉ चोळके, डॉ गवळी, उत्तम चरमळ माजी सभापती सुनिल देवकर, सुभाष जोर्वेकर, नाना लोंढे, माणिक वक्ते, मधुकर चव्हाण, किरण वक्ते, बापू चव्हाण, कानिफनाथ वक्ते, सुभाष निर्मळ यांच्यासह विविध संस्थाचे आजी माजी पदाधिकारी, पंचकोशीतील भजनी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
सौ. स्नेहलता कोल्हे यांनी देखील रमेशगिरी महाराजांचा सत्कार करत कोरोना काळात रमेशगिरी महाराजांची उर्जा मिळाली म्हणूनच आपल्यावरील दिव्य संकट टळले. जनार्दन स्वामींबरोबरच त्यांच्या दर्शनाने मनातील सगळा ताणतणाव दुर होतो असे सांगितले.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे आणि राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे एक अतुट नाते आहे. कोपरगांव बेट ही भूमि ऐतिहासिक आणि पौराणिक धार्मिक वारसा परंपरेची असून गुरू शुक्राचार्य, कचेश्वर देवयानी, चांगदेव महाराज, संत ज्ञानेश्वर, नामदेव, सोपान, मुक्ताई आदिबरोबरच कोकमठाणचे ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांची कर्मभूमी असुन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी त्यांच्या तपसाधनेत श्रमदानातुन काशिविश्वेश्वर महादेव मंदिराचे निर्माण करून अध्यात्माचा पाया महानिर्वाणानंतर याठिकाणी त्यांचे भव्यदिव्य समाधीमंदिर उभे राहिले. मौनगिरी जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख स्व. मोहनराव चव्हाण यांनी जनार्दन स्वामींच्या विचारांची ध्वजपताका संपुर्ण महाराष्ट्र राज्यात पेरून या कार्याला मोठे बळ दिले.
एकादशी चार्तुमास समाप्तीनिमीत्त जयबाबाजी भक्त परिवार कोपरगांव बेट, आकाश देवकर (कोल्हार), उदावंत बंधु (पुरणगांव), सरपंच सुनिता भिमा संवत्सरकर (शिंगणापुर) किशोर पानगव्हाणे, अरूण बोडखे (नाशिक) यांनी महाप्रसादाचे वाटप केले. जनार्दन स्वामींसह रमेशगिरी महाराजांचे दर्शन आणि अकरा एकादशीचा कृपाप्रसाद आपल्याला मिळाल्याचा अनुभव हभप खरात महाराज (वावी) यांनी यावेळी बोलून दाखविला.