शिर्डीत साई भक्तांच्या गर्दीचा विचार करता साई दर्शन व भोजनालय खुले करावे- अध्यक्ष आ. आशुतोष काळे

शिर्डीत साई भक्तांच्या गर्दीचा विचार करता साई दर्शन व भोजनालय खुले करावे- अध्यक्ष आ. आशुतोष काळे

Considering the crowd of Sai devotees in Shirdi, Sai Darshan and restaurant should be opened. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 15 Nov.2021,17.00Pm.

कोपरगाव: साईबाबांच्या दर्शनासाठी वाढणारी गर्दी आणि दर्शन न घेता परतणाऱ्या निराश साईभक्तांचा विचार करता साईबाबांचे दर्शन खुले करून भोजनालय सुरू करावे अशी मागणी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले एका पत्राद्वारे केली आहे.

अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी पत्रात म्हटले आहे की दुसरी लाट उसळली असून सर्वच देवस्थानावर कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी वाढत असून ऑनलाइन  प्रणालीमुळे अनेकांना दर्शनापासून मुकावं लागत आहे देशभरातून शिर्डीत येऊनही दर्शन होत नसल्याने अनेक साई भक्तांना निराश मनाने परतावे लागत आहे. भोजनालय बंद असल्यामुळे अनेक भक्तांना चांगले भोजन मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहे. दुसरीकडे दिवाळीनंतरही शिर्डी मध्ये मोठ्या प्रमाणात साई भक्तांची गर्दी आहे. पुढच्या महिन्यात नाताळ सुरू होत असल्याने शिर्डीला पुन्हा गर्दी वाढण्याची शक्यता आहे या सर्व परिस्थितीचा विचार करून साईबाबा दर्शन व भोजनालय खुले करण्यात यावे असे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या पत्रात म्हणटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page