गोदावरी कालवा आवर्तनाच्या तारखासाठी संजय काळे यांचा बैठा सत्याग्रह 

गोदावरी कालवा आवर्तनाच्या तारखासाठी संजय काळे यांचा बैठा सत्याग्रह

Satyagraha of Sanjay Kale for the date of rotation of Godavari canal

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon22 Nov.2021 17.00Pm.

कोपरगाव : जायकवाडी धरण भरले व जायकवाडी कालव्यांच्या रब्बी व खरीप हंगामाच्या तारखा जाहीर झाल्या.१५ ऑक्टोबरला दारणा गंगापूर धरणे पूर्ण भरले. गहू हरबऱ्याच्या पेरणीचा हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू झाले. पण आवर्तनाच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत तेंव्हा झोपलेले शासन व लोकप्रतिनिधींना जागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सोमवारी सकाळी साडेदहा ते दुपारी चार वाजता साडेचार वाजेपर्यंत गोदावरी डावा कालवा कोपरगाव कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह केला.

१७ नोव्हेंबर रोजीच्या पत्रातून काळे यांनी हा इशारा दिला होता. सोमवारी (२२) रोजी सकाळी गोदावरी डावा कालवा कार्यालय कोपरगाव येथे संजय काळे यांचा सात बैठा सत्याग्रह सुरू असताना पालकमंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या सहीचे गोदावरी डावा तट कालवा समितीची बैठक कोपरगाव येथे तर गोदावरी उजवा कालवा ही बैठक राहता येथे संबंधित विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली घेण्याचे नियोजन करावे असे पत्रही संजय काळे यांना दिले आहे.

लवकरच बैठक घेण्यात येईल तेंव्हा आपण आपला बैठा सत्याग्रह आंदोलन स्थगित करावे अशी विनंती यावेळी पाटबंधारे विभाग अधिकारी यांनी संजय काळे यांना केली होती.

Leave a Reply

You cannot copy content of this page