कोपरगावात आजपासून हर घर दस्तक अभियान सप्ताह – विजय बोरुडे
Every house in Kopargaon from today Dastak Abhiyan Saptah – Vijay Borude
एकच लक्ष १००% लसीकरण Single target 100% vaccination
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun21 Nov.2021 18.00Pm.
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर दस्तक’ सप्ताह अभियान आज सोमवारी २२ ते ३० नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे. अशी माहिती कोपरगांवचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली आहे.

तहसीलदार विजय बोरूडे म्हणाले, गावनिहाय लसीकरण करण्यासाठी
तालुका आरोग्य अधिकारी यांनी या गावांमध्ये किमान ५ लसीकरण पथके तयार ठेवावीत.यात आशा स्वयंसेविका, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, कोतवाल,बी.एल.ओ यांचा समावेश राहणार आहे.
श्री बोरूडे म्हणाले, अभियान यशस्वी करण्यासाठी तारीखनिहाय लसीकरण मोहीमेची तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांवर पथक प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. २२ नोव्हेंबर रोजी मंजुर, कारवाडी, धामोरी, सांगवी भुसार या गावांमध्ये तालुका गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी , २३ नोव्हेंबर रोजी सुरेगांव, कोळपेवाडी, तिळवणी, आपेगांव या गावांमध्ये पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी व ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, २४ नोव्हेंबर रोजी गोधेगांव, शिरसगांव, ओगदी, अंचलगाव या गावांमध्ये भुमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक, २५ नोव्हेंबर रोजी सोयगांव, रांजणगाव देश, बहादरपुर या गावांमध्ये सहकारी संस्था सहायक निबंधक व पशुवैद्यकीय अधिकारी , २६ नोव्हेंबर संवत्सर व शिंगणापूर या गावांमध्ये तालुका कृषी अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, २७ नोव्हेबर रोजी कोपरगांव शहरात नगरपालिकेचे मुख्याधिकारी, २८ नोव्हेंबर रोजी वारी या गावामध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांना शंभर टक्के लसीकरणासाठी पथकप्रमुख म्हणून जबाबदारी जबाबदारी देण्यात आली आहे.या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी अद्याप लस न घेतलेल्या नागरिकांची यादी तयारी करून घ्यावी.अशा सूचना दिल्या आहेत याकामी सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनीही मदत करावी असे आवाहन तहसीलदार बोरुडे यांनी दिले आहे.