कोपरगाव शिर्डी पोलीस स्टेशन इमारतीत पोलीसांचे कामकाज सुरु करावे- संजय काळे

कोपरगाव शिर्डी पोलीस स्टेशन इमारतीत पोलीसांचे कामकाज सुरु करावे- संजय काळे

    Police work should be started in Kopargaon Shirdi police station building – Sanjay Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 24Jan.2022 17.00Pm.

कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव व शिर्डी येथे अद्ययावत पोलीस स्टेशनचे बांधकाम पूर्ण होऊन जवळ जवळ सहा महीने पुर्ण झाले. तसेच शिर्डी मध्ये पोलीसांसाठी घरांचे देखील बांधकाम पुर्ण झालेत. तेव्हा येत्या आठ दिवसात या इमारतीमध्ये पोलिस स्टेशनचे कामकाज सुरू करण्यात यावे असे आदेश आपण द्यावेत अशी मागणी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.

 या निवेदनामध्ये काळे यांनी म्हटले आहे की,  शासनाने कोट्यावधी रूपयांचा खर्च केलेला आहे पण ह्या वास्तू अजून वापरात नाही.. तात्पूर्त्या केलेल्या सोईसाठी शासन भाडे मोजत आहे.. जर नव्या जागेत पोलीस कार्यालये चालू झालेत तर शासनाचा खर्च वाचेल तसेच पोलीस कर्मचारी नवीन जागेत नवीन उत्साहात काम करतील.ह्या ईमेल द्वारे आपणास आवाहन करीत आहे की सदरच्या वास्तू आपण आठ दिवसात लोकार्पण करावे. अन्यथा उच्च न्यायालयात आपले व्यवस्थापना विरूध्द   याचिका दाखल करण्यात येईल.

तसेच २६ जानेवारी २०२२ प्रजासत्ताक दिनाचे दिवशी लोकार्पण  सोहळा आयोजित केला जाई  २७ जानेवरी २०२२ रोजी सकाळी १० वाजता विना घेऊन मी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांना नवीन पोलीस स्टेशन मध्ये शासकीय कामकाज चालू करण्यासाठी निमंत्रीत करणार.  तसेच २७ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १ वाजता कोपरगाव ग्रामीण चे पोलीस निरीक्षक यांना नवीन जागेत शासकीय कामकाज चालू करण्यासाठी निमंत्रीत करणार आहे. 

 दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता वीना वाजवत शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक व पोलीस निरिक्षक यांना नवीन जागेत शासकीय कामकाज चालू करण्यासाठी निमंत्रीत करणार आहे.  करदात्या जनतेने पोलीसांसाठी इमारती उभ्या केल्या आहेत.केवळ उदघाटनाच्या प्रतिेक्षेत नव्या इमारती धूळ खात पडून असल्यामुळे व शासनाच्या उदासीनतेमुळे मी हा निर्णय घेत आहे  त्वरित आठ दिवसात नवीन इमारतीत पोलीसांचे कामकाज चालू होण्याचे आदेश त्यांनी शेवटी म्हंटले आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page