कोपरगाव इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), अध्यक्ष डॉ. संजय उंबरकर, जनरल सेक्रेटरी डॉ. मयूर तिरमखे
Kopargaon Indian Medical Association (IMA), President Dr. Sanjay Umbarkar, General Secretary Dr.Mayur Tirmakhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 25Jan.2022 13.00Pm.
कोपरगांव : राज्य व राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशन या शिखर संस्थेच्या कोपरगांव शाखेची सन २०२२ ची कार्यकारणी नुकतीच एका बैठकीत जाहीर करण्यात आली त्यामध्ये अध्यक्षपदी अस्थिरोग तज्ञ डॉ.संजय उंबरकर व जनरल सेक्रेटरी म्हणून स्त्रीरोग तज्ञ डॉ.मयूर तिरमखे तसेच खजिनदार म्हणून डॉ.पंकज बूब यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी कोपरगांव शाखेचे मावळते अध्यक्ष डॉ.महेंद्र गोंधळी,सचिव डॉ.योगेश कोठारी यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देतांना नवनियुक्त अध्यक्ष, सेक्रेटरी यांनी येत्या वर्षात सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक व क्रीडा विभागात नाविन्यपूर्ण व आरोग्यविषयक जनजागृतीपर कार्य आदी उपक्रम राबविले जाईल असे सांगितले.