सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ नामकरणाचा ठराव मंजुर-कोल्हे.
Sahakarratna Shankarrao Kolhe Shetkari Sahakari Sangh naming resolution approved-Kolhe.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 25Jan.2022 16.30Pm.
कोपरगांव : महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार, महसुल, कृषी, परिवहन, पणन मंत्री, विधानसभेचे माजी हंगामी सभापती व संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक शंकरराव कोल्हे यांच्या सात दशकांच्या सामाजिक कार्याची उतराई व्हावी म्हणून येथील शेतकरी संघाचे नांव बदलुन ते सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ करण्याबाबतचा ठराव बहुमताने मंजुर करण्यांत आल्याची माहिती सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली.
शेतकरी सहकारी संघाने तालुक्यात अन्यत्र नव्याने शाखा उघडुन खते, किटकनाशका बरोबरच अन्य नाविन्यपुर्ण व्यवसायाकडे वळावे असा सल्ला देवुन देशात पहिल्या दहा मध्ये या संघाचे नांव असेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
शेतकरी सहकारी संघाची ८५ वी वार्षीक सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली त्यात ते बोलत होते. प्रारंभी अध्यक्ष संभाजीराव गावंड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष विलासराव कुलकर्णी यांनी अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासद शेतकरी बांधवांना श्रध्दांजली वाहिली. व्यवस्थापक हरिभाउ गोरे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचुन कायम केले.
विषय पत्रिकेवरील सर्व विषय उपस्थित सभासदांनी टाळयांच्या गजरात मंजुर केले.
तज्ञ संचालक विवेक कोल्हे म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी येथील शेतक-यांच्या बांधावर आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी अविरत कष्ट घेत शेतकरी सहकारी संघाची स्थापना करून खुल्या अर्थव्यवस्थेत शेतकरी व त्यांच्या पिकांना संरक्षण मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. शेतकरी संघास ऑडिट वर्ग अ मिळाला आहे, ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शेतक-यांनी शेती पिकासाठी करावा असे सांगुन कृषक भारती सहकारी संस्था नविदिल्लीच्या वतींने शेतकरी सहकारी संघाने अहमदनगर जिल्हयात सर्वाधिक उत्कृष्ट विकी केल्याबददल सर्वप्रथम बेस्ट को-ऑपरेशन अॅवॉर्ड देण्यांत आला त्याचा स्विकार बिपीनदादा कोल्हे यांनी केल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी संचालक सर्वश्री. वाल्मीक भास्कर, अंबादास देवकर, नानासाहेब गवळी, कल्याणराव चांदगुडे, चांगदेवराव आसने, चंद्रकांत देवकर, मच्छिंद्र लोणारी, बबनराव निकम, विजय रोहम, रघुनाथ रघुनाथ फटांगरे, छबुराव माळी, सौ यमुनाबाई बढे, सुभाषराव गायकवाड, शिवाजीराव कदम, विश्वासराव गाडे, अरूण भिंगारे, मधुकर उगले, संजय भाकरे, राजेश कदम, बाजीराव मांजरे, अरूणराव येवले, संजयराव होन, बाळासाहेब वक्ते, पुरूषोत्तम बोरावके, पराग संधान, विश्वासराव महाले, शिवाजीराव वक्ते, दिलीप बनकर, साहेबराव रोहोम, निवृत्ती बनकर, इफकोचे एरिया मॅनेजर दिनेश देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी संचालक बबनराव निकम यांनी आभार मानले.