ना. आशुतोष काळे कोरोना पॉझिटिव्ह
NA. Ashutosh kale Corona Positive
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 25Jan.2022 16.40Pm.
कोपरगाव : श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती त्यांनी स्वत: मंगळवार (दि.२५) रोजी ट्विट करून दिली आहे. ना. आशुतोष काळे यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत नसून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. माझ्या तब्बेतीची काळजी करण्याचे कारण नाही. मात्र माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
ना. आशुतोष काळे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची बातमी कार्यकर्त्यांना समजताच सोशल मिडीयावर कार्यकर्त्यांनी तब्बेतीची काळजी घ्या, लवकर बरे व्हा अशा आशयाच्या भावनिक पोस्ट टाकून सहानुभूती व्यक्त केली आहे.
ना. आशुतोष काळे यांनी देखील या भावनिक पोस्टला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देत जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असून आपल्या आशीर्वादाने व साईबाबांच्या कृपेने लवकरच जनसेवेसाठी हजर होणार असल्याचे सांगितले आहे.