साईबाबांना ना.आशुतोष काळेंच्या आरोग्यासाठी साकडे

साईबाबांना ना.आशुतोष काळेंच्या आरोग्यासाठी साकडे

To Sai Baba for the health of Na. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 27Jan.2022 17.20Pm.

 कोपरगाव: श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे कोरोनातून मुक्त व्हावे व त्यांचे आरोग्य आबाधित राहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिर्डीला पायी जावून साईबाबांना साकडे घातले आहे. तर संवत्सरमध्ये कार्यकर्त्यांनी ग्रामदैवत हनुमान मंदिरात आरती करून प्रार्थना केली आहे.

ना.आशुतोष काळे यांना कोरोना झाला. त्यांनी लवकरात लवकर कोरोनावर मात करावी.यासाठी कार्यकर्त्यांनी दवा के साथ दुवा पण तेवढीच महत्वाची आहे. गुरुवारी (दि.२७) रोजी कोपरगाव येथील साईबाबा तपोभूमी ते शिर्डी येथे पायी जावून साईबाबांना साकडे घातले. तसेच राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर, जुनीगंगा जगदंबा देवी मंदिर येथे देखील प्रार्थना केली व संवत्सर येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामदैवत हनुमान मंदिरात आरती केली.

यावेळी श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त महेंद्र शेळके, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल गंगूले,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विरेन बोरावके, संदीप पगारे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे लवकरात लवकर कोरोनामुक्त होवून त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी मुस्लीम बांधवांनी कोपरगाव येथील मोहम्मदिया मस्जिदमध्ये नमाज पठण करून दुवा मागितली.

Leave a Reply

You cannot copy content of this page