रिक्षाचालक आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक रिक्षाला बारकोड स्टिकर

रिक्षाचालक आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक रिक्षाला बारकोड स्टिकर

Barcode stickers on each rickshaw for the safety of rickshaw pullers and customers

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 27Jan.2022 17.00Pm.

कोपरगाव : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कोपरगाव तालुका ऑटोरिक्षा टँक्सी संघटनेमार्फत प्रत्येक रिक्षाला संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व पत्रकार यांच्या हस्ते बारकोड स्टिकर लावण्यात आले.

यावेळी बोलतांना संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव म्हणाले, रिक्षांची संख्या वाढली आहे. कोपरगाव शहर असो बाहेर गावातील संघटनेचे सभासद नसलेल्या  रिक्षाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.  ये-जा करीत असतात त्यामुळे पोलीस असो की पॅसेंजर यांना नेमकी संघटनेची रिक्षा कोणती हे कळत नाही. त्यामुळे शिर्डी कोपरगाव पोलिसांच्या आग्रहाखातर  रिक्षा संघटनेच्या प्रत्येक रिक्षाला संघटनेचा मोनोग्राफ व बारकोड असलेले स्टिकर लावण्यात आले आहे. यामुळे पोलीस असो की पॅसेंजर यांचा संभ्रम होणार नाही. तसेच यामुळे रिक्षाचालकाला ही सुरक्षा मिळणार आहे. 

यावेळी बोलताना संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र  सालकर म्हणाले, बऱ्याच दिवसापासून कोपरगाव व शिर्डी पोलिसांनी तुमच्या रिक्षा संघटनेच्या रिक्षा कोणत्या आहेत यासाठी काहीतरी निशाणी असावी अशी वारंवार मागणी केली होती. या मागणीनुसारच कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या प्रत्येक रिक्षाला आज रिक्षा संघटनेच्या मोनोग्राम रजिस्ट्रेशन नंबरसह बारकोड स्टिकर लावण्यात आले आहे. या स्टिकरवर अध्यक्ष कैलास जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र सालकर या दोघांचे मोबाईल नंबर संपर्कासाठी दिले आहेत. तसेच स्टिकरवर सदर रिक्षा कोणत्या स्टॅण्डवरील आहे. याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे एखाद्या ग्राहकाला किंवा चालकाला काही अडचण आली. तर ताबडतोब संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे पॅसेंजर रिक्षा चालक संघटना पोलीस प्रशासन यामध्ये विश्वासार्हता व पारदर्शकता निर्माण होणार आहे असे त्यांनी सांगितले. 

यावेळी  पत्रकारांच्या हस्ते रिक्षांना स्टिकर लावण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव उपाध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र सालकर, पत्रकार राहुल देवरे, पत्रकार मनोज जोशी, पत्रकार महेश जोशी, पत्रकार शंकर दुपारगुडे, पत्रकार दीपक जाधव, पत्रकार अक्षय खरात,  पत्रकार व मल्हारी देशमुख, पापा तांबोळी, सुनील तांबट, अनिल वाघ,  सुनील पांडे, राजेंद्र कोपरे, संजय पवार,  सुनील वाघ, संघटनेच्या सर्व  स्टॅन्ड चे पदाधिकारी सदस्य आदीसह पत्रकार उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page