समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

73rd Republic Day celebrated at Samata International School

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 28Jan.2022 16.30Pm.

कोपरगाव : आचार,विचार,संस्कारामुळे समताचे शैक्षणिक दृष्ट्या सर्व गुण संपन्न विद्यार्थी समताचा झेंडा सातासमुद्रापलिकडे फडकवतील.असे गौरवोद्गार माजी सैनीक अध्यक्ष युवराज गांगवे यांनी समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त व्यक्त केले. अध्यक्षस्थानी संस्थापक काका कोयटे हे होते.

यावेळी समता महिला बचत गट अध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे,समता पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन सौ.श्वेता अजमेरे,जेष्ठ संचालक अरविंद पटेल, गुलशन होडे,समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे,मुख्य कार्यवाह संदीप कोयटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन यांनी केले तर स्वागत उपप्राचार्य समीर अत्तार यांनी केले.

त्यानंतर समता टायनी टॉट्स मधील शौर्य शर्मा,रैना अगरवाल,स्वराली गोपाळ,पहेल जैन यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व भाषणातून व्यक्त केले. विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.

इ.९ वी व इ.१० वी तील विद्यार्थ्यानी तबला,गिटार,पियानोच्या तालावर तु मेरा कर्मा, तु मेरा धर्मा हे गीत सादर केले. यात प्रामुख्याने कुलदीप कोयटे,सिद्धांत जोशी, कामरान अत्तार, निहार गीते,सुजल संचेती, राजहंस आढाव यांचा समावेश होता. सुत्रसंचालन विद्यार्थिनी सुचिता पवार व शंतनू होन यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता स्कूलचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार उपप्राचार्य समीर अत्तार यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page