कु.श्वेतांबरी राऊत हिची अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेवर निवड
Ms. Shwetambari Raut elected to All India Consumer Welfare Council
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 28Jan.2022 16.40Pm.
कोपरगाव: अहमदनगर जिल्हा ग्राहक कल्याणासाठी अखिल भारतीय ग्राहक परिषद या राष्ट्रीय संघटनेची निर्मिती करण्यात आलेली आहे.नुकतीच परिषदेच्या/राज्यस्तरीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या कार्यकारिणीमध्ये नॅशनल जनरल सेक्रेटरी देवेंद्र तिवारी यांच्या मार्गदर्शनात अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी कोपरगाव येथील महाराष्ट्र परीट (धोबी)सेवा मंडळाच्या पाश्चिम-उत्तर महाराष्ट्र (अहमदनगर-नाशिक-औरंगाबाद) विभागीय अध्यक्षा कु.श्वेतांबरी राऊत यांची निवड करण्यात आलेली आहे निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.