कोपरगाव शिवसेना शिवजयंतीच्या अध्यक्षपदी शेखर कोलते

कोपरगाव शिवसेना शिवजयंतीच्या अध्यक्षपदी शेखर कोलते

Shekhar Kolte as the President of Kopargaon Shiv Sena Shiv Jayanti

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Tur 8 Mar 2022 18:30Pm.

कोपरगाव : कोपरगाव शहरात अनेक वर्षांपासून सातत्याने शिवसेनेच्या वतीने तिथीप्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणाऱ्या शिवजयंती समितीच्या अध्यक्षपदी शेखर कोलते व उपाध्यक्षपदी दत्तू पठारे यांची निवड करण्यात आली.

या महिन्यात २१ मार्चला होणाऱ्या शिवाजी महाराज जयंती संदर्भात शिवजयंती समितीची बैठक नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

यावेळी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल, महिला उपजिल्हाप्रमुख सपना मोरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विशाल झावरे आदी प्रमुख उपस्थित होते. या सभेत जयंती साजरी करण्यासाठी समितीचे नवनियुक्त अध्यक्ष शेखर कोलते, उपाध्यक्ष दत्तू पगारे, सचिव योगेश उशीर, वैभव गिते, सुनील कुंढारे,  बाळासाहेब साळुंके,गौरव गुप्ता, सपना मोरे, वर्षा शिंगाडे,राखी विसपुते, अश्विनी होणे, अक्षिता आमले,शितल चव्हाण, अविनाश धोक्रट, अविनाश वाघ, प्रवीण शेलार, दिलीप अरगडे, श्रीपाद भसाळे, निखिल मढवई, किरण अडांगळे,अक्षय वाकचौरे, सुनील राका, वसीम शेख, सतीश शिंगाणे, संजय बाविस्कर,विजय शिंदे, मंगेश देशमुख, कार्यवाहक संतोष भालेराव, अमजद शेख,दिपक बरदे,राकेश वाघ. या प्रमाणे कार्यकारणी जाहिर करण्यात आली.

या वेळी शिवसैनिक उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल देशपांडे यांनी केले तर आभार बाळासाहेब साळुंके यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page