महिलादिनी समताच्या विद्यार्थिनींची गांधीगिरी.. रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण

महिलादिनी समताच्या विद्यार्थिनींची गांधीगिरी.. रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण

Gandhigiri of Samatya students on Women’s Day .. Tree planting in a pothole

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Tur 8 Mar 2022 18:20Pm.

कोपरगाव : नियम पाळून मोर्चे, उपोषणे, निवेदन देणे, निदर्शने अशा आंदोलनानंतर आता गांधीगिरी पद्धतीचे आंदोलनही करण्यात आले. नागरी प्रश्नांवर विविध संघटनांनी पुन्हा आंदोलनांचे हत्यार उपसले असल्याचे यावरून दिसू येते. पुणतांबा चौफुली ते समृद्धी महामार्ग या रस्त्यावरील खड्डयांसंबंधी मंगळवारी महिलादिनी समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी व महिला शिक्षिकांनी वृक्षारोपण करून असेच एक आंदोलन केले.

समता स्कूलचे विद्यार्थी कर्मचारी शिक्षक असे हजारोजण व पंचवीस ते तीस वाहने दररोज ये-जा करीत असतात .मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. मुलांना धुळीचा प्रचंड त्रास होतो व येण्याचा व जाण्याच्या जास्तीच्या लागणाऱ्या वेळेमुळे विद्यार्थ्यांचा अर्धा तास अभ्यासाचा वेळ दररोज वाया जातो.त्यामुळे याचा निषेध नोंदवत संता स्कूलच्या विद्यार्थिनीनी खड्ड्यात वृक्षारोपण करीत त्याला हार घालत गांधीगिरी केली.असे प्राचार्या लिसा बर्धन म्हणाल्या ,‘

यापूर्वी आमच्या व्यवस्थापनाने सन्माननीय लोक प्रतिनिधी तसेच प्रशासनास अनेकदा मागणी करून देखील या रस्त्याचे काम सुरु झाले नाही. या आंदोलनाने प्रशासनास जाग न आल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन सर्व विद्यार्थ्यांना करावे लागेल याची प्रशासनाने दखल घ्यावी.

वृक्षारोपण करताना स्कूलची विद्यार्थिनी राजहंस मंदार आढाव, योगिता रामनाथ वाघ,अनुष्का प्रीतम जपे,ईप्सीता संदीप राय,अनुष्का प्रीतम जपे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी कोकमठाण, सडे, शिंगवे परिसरातील नागरिक यांनी देखील या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page