शिवविचारामुळे राजकारणात असूनही मला सर्व जाती धर्माबद्दल प्रचंड आदर- मंगेश पाटील
Due to Shiv Vichar, despite being in politics, I have great respect for all castes and religions – Mangesh Patil
के.बी. रोहमारे स्मृती करंडक वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरणK.B. Rohmare Memorial Trophy Eloquence Competition Prize Distribution
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Wed 9 Mar 2022 18:00Pm.
कोपरगाव :धर्म निरपेक्ष जाणता राजा शिवछत्रपती हा अतिशय कालसापेक्ष विषय असल्याने इथे आल्यानंतर मला माझ्या बालपणातील उदयनराजे भोसले चेअरमन असलेल्या मिलिट्री स्कूलमधील शिस्तबद्ध जीवनाची आठवण झाली. हा क्षण माझ्यासाठी भाग्याचा आहे.बालवयापासून रोमा-रोमात भिनलेल्याशिवविचारामुळे राजकारणात असूनही मला सर्व जातीधर्माबद्दल प्रचंड आदर असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी के.बी. रोहमारे स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी केले अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ॲड. संजीव कुलकर्णी होते.
विश्वस्त संदीप रोहमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंगेश पाटील पुढे म्हणाले, बोलायचे असेल तर उत्तम व भरपूर वाचन करावे लागते. वक्तृत्वासाठी भाषा व शैली विकसित करावी लागते. या सर्वांचा उपयोग जीवन घडवण्यास होतो. पारितोषिक प्राप्ती हेकठोर परीश्रमाचेच फलित आहे.स्पर्धेचे उद्घाटक डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी देखील पुढील वर्षी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्यास स्पर्धेचा हेतू खऱ्या अर्थाने साध्य होईल. पाल्याच्या उच्च शिक्षणासाठी सोमैया महाविद्यालयाची अग्रक्रमाने निवड ही सोमैया महाविद्यालयाच्या लौकिकाची पावती आहे. असे गौरवोद्गार शेवटी व्यक्त केले.
ॲड. संजीव कुलकर्णी म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये वक्तृत्व गुणांचा विकास व्हावा व विचारमंथन करून त्यांना नीट व्यक्त होता यावे यासाठी १९९० नंतर खंडित झालेल्या भि. ग. रोहमारे वादविवाद स्पर्धेचे आम्ही नव्या रुपाने पुनरुज्जीवन केले. त्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपन्यातील बहुसंख्य स्पर्धकांनी भाग घेऊन आमच्या स्पर्धेला मुल्य प्राप्त करून दिले त्याबद्दल मी सर्व स्पर्धकांना धन्यवाद देतो. या पुढेही या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.”
या स्पर्धेत के. बी. रोहमारे करंडकाचे मानकरी विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर (औरंगाबाद), कु. तृप्ती अर्जुन थोरात व कु. जयश्री रावसाहेब आहेर तर वैयक्तिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रु. १०,०००/- ची मानकरी कु. प्रणाली पांडुरंग पाटील, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वारणानगर (कोल्हापूर), द्वितीय पारितोषिक रु.७०००/- चा मानकरी सारांश धनंजय सोनार (डॉ. आंबेडकर अध्यासन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव), तृतीय पारितोषिक रु.५०००/- चे मानकरी विभागून साईनाथ नामदेव महाद्वाड (यशवंत महाविद्यालय नांदेड व कु. रूचिका विकास चौधरी, जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी) तर अवधूत भगवान पाटील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे य संतोष सर्जेराव शिंदे क्रिस्टोन अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे) यांनी प्रत्येकी रु.१००१/- चे उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.
पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी केले. परीक्षक प्रा. डॉ. शांताराम चौधरी, प्रा. डॉ. बाळासाहेब औताडे व प्रा. निलेश गायकवाड यांनी केले. पारितोषिकांची घोषणा स्पर्धा संयोजक डॉ. जिभाऊ मोरे यांनी केली. आभार प्रा. विजय ठाणगे यांनी मानले. तर सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे व प्रा. अशोक सूर्यवंशी यांनी केले. स्पर्धेसाठी डॉ. बी. एस. गायकवाड, प्रा.आर.ए. जाधव, डॉ. एस. एल. अरगडे, प्रा.एम. बी. खोसे, डॉ. व्ही. एस. साळुंके, डॉ. बी. डी. गव्हाणे व डॉ. एन. टी. ढोकळे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे आदीनी विशेष परिश्रम घेतले.